पुण्यात भीषण अपघात! कंटेनरने स्विफ्टला मारली जोरदार धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Pune Latest Accident Update : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात भीषण अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुण्यात स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात

एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

अपघात नेमका कसा घडला?
Pune Latest Accident Update : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात भीषण अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. न्हावरे-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावर एक कंटेनर आणि स्विफ्ट कारची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास अपघाताची दुर्देवी घटना घडली. या अपघातात कैलास गायकवाड (50), गौरी गायकवाड (18), गणेश निर्लेकर (25) यांचा मृत्यू झाला. तर कैलास गायकवाड यांची पत्नी दुर्गा गायकवाड (45) गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कसा झाला अपघात?
रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास कैलास गायकवाड त्याच्या कुटुंबासह स्विफ्ट कारने तळेगाववरून न्हावरे या ठिकाणी जात होते. त्याच दरम्यान वेगाने समोरून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या स्विफ्ट कारला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. कैलास गायकवाड, त्यांची मुलगी गौरी गायकवाड, गणेश निर्लेकर अशी मृतांची नावं आहेत.
हे ही वाचा >> Kunal Kamra : एकनाथ शिंदेंनंतर कुणाल कामराचा मोदींवरही नाव न घेता निशाणा? नेमकं काय म्हणाला, वाचा...
अपघात झाल्यानंतर कंटेनरचा मालक फरार
अपघात घडल्यानंतर कंटेनरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत पावलेल्या लोकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तर जखमी झालेल्या महिलेवर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हे ही वाचा >> कुणाल कामराचं ते वादग्रस्त 'गाणं' जसंच्या तसं... शिंदेंच्या सैनिकांचा तुफान राडा
अपघातात मृत पावलेल्यांना 95 लाखांची मदत
राज्यातील ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतने रस्ते अपघातात मृत पावलेल्या शिक्षकाच्या कुटुंबियांना 95 लाख रुपयांची मदत घोषित केली. खडकपाडा परिसरात 22 नोव्हेंबर 2021 ला सकाळी फेरफटका मारणाऱ्या सुंदरलाल मराठे यांचा अपघात झाला होता. एका टेप्मोने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातात मराठे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मराठे यांच्या कुटुंबियांनाही मदत जाहीर करण्यात आली होती.