Oshin Sharma Video : इंटरनेटवर मार्केट जाम करणाऱ्या ओशिन शर्मा आहेत तरी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Who Is Oshin Sharma
Oshin Sharma Instagram Post
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोण आहेत ओशिन शर्मा? इन्स्टाग्राम पोस्ट पाहून थक्कच व्हाल

point

सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोअर्स

point

ओशिन शर्मांना शासकीय विभागात काम करायचं नव्हतं, पण...

 Who Is Oshin Sharma : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ओशिन शर्मा यांच्या नावाची तुफान चर्चा रंगली आहे. यामागचं कारण जाणून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री अनेक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतात. पण शासकीय अधिकारी असलेल्या ओशिन शर्मांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एकाहून एक जबरदस्त फोटो शेअर केले आहेत. शर्मांचं मनमोहक सौंदर्य पाहून त्यांच्या चाहत्यांच्या मनाला भुरळ पडलीय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

ADVERTISEMENT

हिमाचल प्रदेशच्या मंडी विभागात (संधोल) तहसीलदार पदावर कार्यरत असणाऱ्या शर्मा यांची नुकतीच बदली करण्यात आली होती. त्यानंतर ओशिन शर्मा इंटरनेटवर प्रकाशझोतात आल्या. शर्मा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहत असल्याने त्यांची तगडी फॅन फॉलोईंग आहे.  इन्स्टाग्रामवर त्यांचे तीन लाखांपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत. शर्मांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, त्यानंतर त्यांना नोटिस जारी करून शिमलात (डिपार्टमेंट ऑफ पर्सनल) मध्ये रिपोर्ट करण्यास सांगितलं. या सर्व घडामोडींमुळे ओशिन यांना नेटकऱ्यांनी ट्रोलही केलं होतं.

कोण आहेत ओशिन शर्मा?

ओशिन शर्मा सध्या हिमाचल प्रदेशच्या भाषा आणि संस्कृती विभागाच्या सहाय्यक सचिव आहेत. शर्मांनी त्यांच्या पदाबाबतची माहिती त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट केलीय. ओशिन शर्मांनी पंजाब विद्यापीठातून केमिस्ट्रीत पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात शर्मांनी शासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. यूपीएसची मेन्स परीक्षा दिल्याचा दावाही शर्मांनी सोशल मीडियावर केला आहे. कमी गुण मिळाल्याने त्यांना यात यश मिळालं नाही. 2019 मध्ये ओशिनमध्ये HAS परीक्षा पास केली आणि त्यांची बीडीओ (BDO) च्या पदावर नियुक्ती झाली. 2020 मध्ये ओशिन शर्माने पुन्हा एकदा परीक्षा दिली आणि एसएएस (HAS) मध्ये एसडीएम म्हणून त्यांनी निवड झाली. तसच संधोल मध्ये शर्मा तहसीलदार पदावरही कार्यरत होत्या. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Gold Rates Before Dhanteras in Maharashtra : धनत्रयोदशी आधीच सोनं झालं स्वस्त! 1 तोळ्याचे भाव किती रूपयांनी घसरले? 

सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स

ओशिन शर्मांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साडेतीन लाखांहून (357 k) अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांचे फेसबुकवर जवळपास 3 लाख आणि युट्यूबवर 60 लाखांच्या आसपास फॉलोअर्स आहेत. ओशिन शर्मा युट्यूवर स्पर्धा परीक्षासंदर्भात व्हिडीओ पोस्ट करत असतात. ओशिन त्यांच्या भाषणाचे व्हिडीओही शेअर करत असतात. ओशिन लाडली फाऊंडेशनच्या ब्रँड अॅम्बेसेडरही आहेत. ओशिन शर्मा यांच्या व्हिडीओला  हजारोंच्या संख्येत लाईक्स मिळतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकरी त्यांचं कौतुक करतात तर काही जण त्यांच्यावर टीकाही करतात.

हे ही वाचा >> Rule Change : नोव्हेंबरमध्ये बँकांना किती दिवस सुट्टी? क्रेडिट कार्ड ते LPG चे दर, होणार मोठे 5 बदल

ओशिन शर्मा मूळच्या चंबा जिल्ह्यातील भरमौर येथील आहेत. त्यांचे वडील धर्मशालामध्ये नोकरी करत होते. त्यामुळे शर्मा त्यांच्या कुटुंबासोबत याठिकाणी शिफ्ट झाल्या. त्यांचे वडील नायब तहसीलदार पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या आई सरकारी कर्मचारी म्हणून काम पाहत होत्या. त्यांची लहान मुलगी बँक कर्मचारी आहे. ओशिन शर्मांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, त्यांना शासकीय सेवेत काम करायचं नव्हतं. त्यांना डॉक्टर व्हायचं होतं. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT