Maulana Mufti Salman Azhari: कोण आहे मौलाना मुफ्ती सलमान अझहरी? ज्याच्यामुळे घाटकोपरमध्ये झाला राडा

रोहित गोळे

ADVERTISEMENT

who is maulana mufti salman azhari because the controversial legislation has caused an uproar in ghatkopar
who is maulana mufti salman azhari because the controversial legislation has caused an uproar in ghatkopar
social share
google news

Who Is Maulana Mufti Salman Azhari: मुंबई: मुस्लिम धर्मगुरू मौलाना मुफ्ती सलमान अझहरीला गुजरातच्या जुनागडमध्ये द्वेषयुक्त भाषण (Hate Speech) पसरवल्याच्या आरोपावरून रविवारी गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले. मौलानाला मुंबईतील घाटकोपर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. यानंतर मौलाना यांच्या समर्थकांचा मोठा जमाव पोलीस ठाण्याबाहेर जमा झाला होता. या रिपोर्टमधून आपण जाणून घेऊयात की, नेमका कोण आहे मौलाना मुफ्ती सलमान अजहरी आणि नेमकं कशामुळे त्याला दहशतवादविरोधी पथकाने घाटकोपरूमधून ताब्यात घेतलंय त्याविषयी. (who is maulana mufti salman azhari because the controversial legislation has caused an uproar in ghatkopar)

ADVERTISEMENT

मौलाना मुफ्ती यांनी 31 जानेवारी रोजी गुजरातमधील जुनागढ येथे आयोजित एका कार्यक्रमात संबोधित केले होते. वृत्तानुसार, त्यांच्या भाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, ज्याचे वर्णन वादग्रस्त म्हणून केले जात आहे. याप्रकरणी मौलाना आणि कार्यक्रम आयोजकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आयोजकांना अटकही करण्यात आली आहे.

हे ही वाचा>> junagadh hate speech case: घाटकोपरमधून मौलाना अझहरीला घेतले ताब्यात, तणाव, लाठीचार्ज अन्..

कोण आहे मौलाना मुफ्ती सलमान अझहरी?

मौलाना मुफ्तीच्या ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, तो इस्लामिक रिसर्च स्कॉलर आहे. तो जामिया रियाझुल जन्ना, अल-अमान एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट आणि दारुल अमानचे संस्थापक आहे. त्याने कैरो येथील अल अझहर विद्यापीठातून शिक्षण घेतल्याचे सांगितले जाते. मौलाना मुफ्ती हा अनेक सामाजिक-धार्मिक कार्यात सक्रिय दिसला आहे. त्यामुळेच मुस्लिम समाजात त्याची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे.

हे वाचलं का?

मौलाना काय म्हणाला, ज्यामुळे सुरू झाला वाद?

वृत्तानुसार, जुनागढमधील मौलाना मुफ्ती सलमान अझहरी याने कर्बलाची शेवटची लढाई बाकी असल्याचे म्हटले होते. त्याने असं म्हणताच काही वेळ शांतता गेला आणि अचानक जोरदार आवाज झाला. कथित व्हिडिओमध्ये, ते ‘लब्बैक’ किंवा ‘रसुलल्लाह’ सारख्या घोषणा देताना दिसत आहेत, इस्लामच्या प्रेषिताच्या शब्दांचे पालन करण्यावर तो जोर देतो, ज्याची पुनरावृत्ती जमाव देखील घोषणा देत असल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा>> Ganpat Gaikwad : भाजप आमदाराने महेश गायकवाडांना कुठे कुठे मारल्या गोळ्या? Photo

मौलानाचे समर्थकांनी केली आडकाठी

मिळालेल्या माहितीनुसार, मौलाना मुफ्ती याला ताब्यात गुजरात एटीएसने ताब्यात घेतल्यापासून त्याच्या समर्थकांनी घाटकोपर पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. मुंबई पोलिसांनी त्याला हटवण्याचे अनेक प्रयत्न केले पण यश आले नव्हते. अखेरचा पर्याय म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला. त्यामुळे या परिसरात बराच वेळ तणावाचं वातावरण होतं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT