Viral: कारमधून विचित्र आवाज यायचा! बोनेट उघडताच कपलला फुटला घाम

मुंबई तक

ADVERTISEMENT

strange sound coming from car engine couple in panic situation viral Story
strange sound coming from car engine couple in panic situation viral Story
social share
google news

सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. अशाच व्हायरल फोटो (Viral Photo) किंवा व्हिडिओच्या अनेक बातम्या देखील समोर येत असतात.अशीच एक बातमी आता समोर आली आहे. या घटनेत एका जोडप्याच्या कारमधून सतत विचित्र आवाज यायचा. या आवाजामुळे जोडप्याला भीती देखील वाटायची. त्यामुळे या जोडप्याने कारमधून येणाऱ्या या आवाजाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना मोठा धक्काच बसला. नेमकं या कारमध्ये असे काय होते? ज्यामुळे जोडप्याला मोठा धक्का बसला होता. हे जाणून घेऊयात. (strange sound coming from car engine couple in panic situation viral Story)

ADVERTISEMENT

डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडच्या (England) ग्लॉस्टरशायर परीसरात सायरा अहमद नावाची महिला राहते. या महिलेच्या कारमधून नेहमीच विचित्र आवाज यायचा. कार सुरु करायला गेल्यावर महिलेच्या कारमधून हा विचित्र आवाज यायचा. पण हा आवाज नेमका कुठून यायचा याची महिलेला कल्पना होती. सुरुवातीला सायरा आणि तिचा पार्टनर जस्टीन शमित्जला कारमधील असलेल्या तांत्रिक खराबीमुळे हा आवाज येत असल्याचे वाटत होते. पण नंतर वेगळीच घटना समोर आली.

हे ही वाचा : Crime: वहिनीसोबत संबंध… मुलांना दिल्या झोपेच्या गोळ्या अन् पत्नीसोबत केलं भयंकर कृत्ये

तांत्रिक खराबीमुळे आवाज येत असल्याचा अंदाज बांधून सायरा आणि जस्टीनने ती मॅकेनिकच्या दुकानात नेली होती.यावेळी सायराने कारमधून विचित्र आवाज येत असल्याची समस्या मांडली होती. ही समस्या ऐकताच मॅकेनिकलला देखील धक्का बसला होता. त्यामुळे भीतीपाई त्याने देखील कारची दुरूस्ती करण्यास टाळले होते.

हे वाचलं का?

मॅकेनिकलने देखील नकार दिल्यानंतर जस्टीनने स्वत:च या आवाजाचा शोध घ्यायला सुरूवात केली. या दरम्यान कारचे बोनेट उघडताच त्यामध्ये साप दिसला होता. बोनेट उघडताना पाहून लगेचच सापाने पळ काढला आणि कारमध्ये जाऊन लपून बससा होता. त्यानंतर सायरा आणि जस्टीनला या आवाजाचे खऱं कारण समजले.

कारमध्ये साप असल्याची माहिती मिळताच सायरा आणि जस्टीनने लगेचच सर्पमित्राला बोलावले होते.या सर्पमित्राच्या सहाय्याने या सापाला बाहेर काढण्यात आले. हा साप कॉर्न जातीचे असल्याचे समोर आले आहे. हा साप विषारी नसतो. तसेच हा साप 2.5 फुटाचा होता. हा साप बाहेर काढताच सायरा जस्टीसने सुटकेचा श्वास सोडला.यासोबत नंतर या सापासोबत फोटोशुट देखील केले आहे. या फोटोशूटचे फोटो सायराने सोशल मीडियावर शेअर करून या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. बाईक असो, कार असो साप जाऊन या गाड्यांमध्ये जाऊन बसतात. त्यामुळे पावसाळ्या गाडी चालवण्यापुर्वी तपासणे खुप आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : धक्कायदायक घटना! धावत्या बसमध्ये तरूणीसोबत शरीरसंबंध ठेवले नंतर…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT