Mufti Salman Azhari : अजहरींचे काय बोलले की, गुजरात पोलिसांनी केली अटक?
Mufti Salman Azhari Latest News : ३१ जानेवारी रोजी गुजरातमध्ये दिलेले भडकाऊ भाषण व्हायरल झाल्यानंतर मौलाना मुफ्ती यांना गुजरात पोलिसांकडून अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT
Maulana Mufti Salman Azhari Speech : इस्लामिक धर्मगुरू मौलाना मुफ्ती सलमान अजहरी हे गुजरात पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. पण, मुफ्ती सलमान अजहरी हे असं काय बोलले की, गुजरात पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली?
ADVERTISEMENT
मुफ्ती सलमान अजहरींना गुजरात पोलिसांनी मुंबईत येऊन अटक केली. ३१ जानेवारी रोजी सलमान अजहरी यांनी गुजरातमध्ये एक भाषण केले होते. हे भाषण व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे सलमान अजहरी कोण आहेत आणि त्यांच्या आरोप काय आहेत?
मुफ्ती सलमान अजहरी कोण?
मौलाना मुफ्ती सलमान अजहरी हे सुन्नी इस्लामिक अभ्यासक आहेत. सलमान अजहरी हे जामिया रियाजुल जुन्नाह, अल अमान एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर ट्रस्ट आणि दारून अमानचे संस्थापक आहेत.
हे वाचलं का?
हेही वाचा >> अजित पवार-जितेंद्र आव्हाडांतील संघर्ष टोकाला! ‘नाटकीबाज’वर म्हणाले ‘कावळा’
सलमान अजहरींनी इजिप्तमधील सर्वात जुन्या अल अजहर विद्यापीठातून शिक्षण घेतलेलं आहे. ते धार्मिक कार्यक्रमांमध्ये ते सक्रिय असतात. त्याचे अनुयायी जगभर आहेत. मुस्लीम विद्यार्थ्यांना ते धार्मिक शिक्षण देण्याचे काम करतात. मौलाना अजहरी हे भडक भाषणामुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात.
सलमान अजहरींचे भाषण काय, का करण्यात आली अटक?
मुफ्ती सलमान अजहरी यांनी ३१ जानेवारी रोजी गुजरातमधील जुनागढमध्ये एक कार्यक्रमात भाषण केलं होतं. अजहरींच्या त्या भाषणाची क्लिप सोशल मीडियावर शनिवारी व्हायरल झाला.
ADVERTISEMENT
व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये अजहरी म्हणत आहे की, “जग आज आपल्याला टोमणे मारतंय की, तुम्ही इतके खरे आहात तर मारले का जात आहात? फिलिस्तानमध्ये तुमच्या इतक्या हत्या का झाल्या? इराक, यमन, फिलिस्तान, अफगाणिस्तान, अरब आणि म्यानमार… प्रत्येक ठिकाणी तुम्ही मारले का जाता?”
ADVERTISEMENT
हेही वाचा >> सुप्रिया सुळेंविरुद्ध अजित पवार ‘या’ नेत्याला उतरवणार मैदानात?
“युवकांनो त्या अन्याय करणाऱ्यांना असं उत्तर द्या जसं मुफ्ती आजमांनी आपल्याला शिकवलं आहे. आपण प्रेषिताचे लढवय्ये आहोत. जो लढवय्या आहे, तो मरण्यासाठीच जन्माला आलेला असतो. जगण्यासाठी आलेला नसतो”, असे त्या भाषणात अजहरी म्हणाले होते. याच भाषणाप्रकरणी गुजरात पोलिसांनी त्यांना अटक केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT