Buldhana Accident: भरधाव ट्रक शेडमध्ये शिरला, झोपलेल्या 12 मजुरांना चिरडले
मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असताना बुलढाण्यातील वडनेर फाट्यावर काम करणाऱ्या मजुरांच्या झोपडीत ट्रक घुसला. त्यामुळे 5 मजुरांचा चिरडून मृत्यू झाला आहे. ट्रक चालक फरार झाला असून गंभीर जखमी झालेल्या मजुरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
Buldhana Accident : राज्यात अपघातांचे प्रमाण वाढत असतानाच बुलढाणा जिल्ह्यात आज पहाटे एक भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 5 मजूरांचा मृत्यू (laborers died) झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पहाटे पाच वाजता आयशर ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याकडेला असलेल्या झोपडीत ट्रक शिरल्याने झोपलेल्या मजूरांचा चिरडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाला असून अपघातस्थळाचे दृश्य भयंकर होते. सध्या मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Nagpur National Highway) क्रमांक सहाचे काम सुरु आहे. त्या ठिकाणी हा अपघात झाला आहे. (buldhana accident 5 laborers death after truck rammed into laborer hut Nagpur-Mumbai highway worked)
ADVERTISEMENT
ट्रकवरील ताबा सुटला
या महामार्गाचे काम करणाऱ्या मजूरांनी वडनेर फाट्याजवळ रस्त्याकडेला झोपडी उभा केली होती. त्याच झोपडीत काम करुन झाल्यानंतर मजूर झोपले होते. त्यानंतर आज सकाळी 5 वाजता भरधाव आयशर ट्रकवरील ताबा सुटल्यामुळे ट्रेक थेट झोपडीत घुसला. त्यामुळे ट्रकखाली चिरडून पाच मजूरांचा मृत्यू झाला आहे. या झोपडीत एकूण 12 मजूर झोपले होते. यामधील 5 मजूरांचा मृ्त्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले.
हे ही वाचा >> लेडी कॉन्स्टेबलचा दाबला गळा, नाल्यात फेकली बॉडी अन् फेक कॉल…; गूढ उलगडल्यावर पोलिसांनाही फुटला घाम
चालक फरार
अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक जागेवरच सोडून पलायन केले आहे. त्याचा शोध पोलीस करत आहेत. अपघातानंतरच दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. रस्त्याकडेचा झोपडीत ट्रक घुसल्याने अपघातानंतर बघ्यांची गर्दी जमली होती.
हे वाचलं का?
मजूरांना चिरडले
दिवसभर काम करुन दमून भागून झोपलेल्या मजूरांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ठार झालेल्या मजुरांची ओळख पटवण्याचे काम सुरु होते. तर गंभीर जखमी झालेल्या मजूरांना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरु करण्यात आले होते.
हे ही वाचा >> आशिष शेलार पुन्हा म्हणाले, ‘आदू बाळ; कवितेतून आदित्य ठाकरेंच्या वर्मावर ‘बाण’
झोपडीत 12 मजूर
ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याकडेला असणाऱ्या झोपडीत ट्रक घुसला. यावेळी झोपडीत 12 मजूर झोपले होते. त्यातील 5 मजूर जागीच ठार झाले तर 5 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या उपचार सुरु असून ट्रक चालकाचा आणि मालकाचा शोध लावण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT