Atul Subhash Case : अनैसर्गिक संबंध ते पैशांची मागणी; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी अतुल सुभाषचे आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अतुल सुभाष यांनी धक्कादायक व्हिडीओमध्ये काय म्हटलं?

point

अतुल सुभाष यांचं प्रकरण नेमकं काय?

Atul Subha Case Details : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये आयटी क्षेत्रातील कर्मचारी अतुल सुभाष यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाने देशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे देशातील हुंड्याच्या प्रकरणांमधील शोषण आणि न्यायालयीन कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथील रहिवासी आणि मृत अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया यांनी अतुल सुभाष आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध एकूण 9 गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, यातील अनेक खटले पत्नीने 'आपल्याला माहिती नसल्याचं सांगून' मागे घेतले, तर काही वेळा वकिलाने आपल्या संमतीशिवाय खटले दाखल केलेत असं म्हणत काही केस मागे घेतल्या. 

ADVERTISEMENT

बेंगळुरूमधील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या ३४ वर्षीय एआय इंजिनिअर अतुल सुभाष यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. ते मूळ उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. त्यांनी 24 पानांची सुसाईड नोट आणि 90 मिनिटांचा व्हिडीओ करत आपल्या या निर्णयामागचं कारण सांगितलं आहे,  यामध्ये अतुल सुभाषने यांनी आपली पत्नी आणि पत्नीच्या कुटुंबावर आपला छळ केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. 

हे ही वाचा >>Manoj Jarange Beed : "तुमच्या आज्याची, बापांची चालत होती, पण आता...", सरपंचाच्या हत्येनंतर जरांगेंचा कुणाला इशारा?

अतुल सुभाष यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की, "मी पैसे देण्यास नकार दिला आणि मी हा निर्णय घेतो आहे. कारण मला माझ्याच पैशांचा वापर त्यांनी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अत्याचार करण्यासाठी व्हावा असं मला वाटत नाही. न्यायालयाबाहेरच्या गटारात माझी राख टाकून द्या." असं म्हणत अतुल सुभाष यांनी टोकाचा निर्णय घेतला.

हे वाचलं का?

अतुल सुभाष यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत, तसंच पत्नी आता आपल्याला तब्बल 3 कोटींची मागणी करत आहे. अतुल सुभाष हे बेंगळुरू शहरातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये DGM म्हणून कार्यरत होते.

अतुलचे वडील पवन कुमार म्हणाले, "त्यांने आम्हाला सांगितलं की न्यायालयातील लोक कायद्यानुसार काम करत नाहीत, सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसारही काम करत नाहीत. त्यांना किमान 40 वेळा बेंगळुरूहून जौनपूरला जावं लागलं." तो नक्कीच निराश असेल, पण त्यानं कधीही आम्हाला ते जाणवू दिलं नाही. अचानक आम्हाला या घटनेबद्दल हे कळलं. त्यानं रात्री एक वाजता आपल्या लहान मुलाला एक मेल पाठवला. तसंच त्यानं केलेले आरोप 100 टक्के खरे आहेत.  रात्री 1 वाजण्याच्या सुमारास तिने मुलाला कधीच कळवले नाही मेल पाठवला हे 100% खरे आहे (मृत व्यक्तीने त्याच्या पत्नीवर आणि त्याच्या कुटुंबावर केलेले आरोप)."

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Nana Patekar : "मी अभिनेता नसतो, तर अंडरवर्ल्डमध्ये...", 'त्या' घटनेबद्दल बोलताना काय म्हणाले नाना पाटेकर?

एकूणच आपल्या पत्नीने आपल्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल केले, ते नंतर मागेही घेतले. याप्करणी आपल्याला अनेकदा बेंगळुरूमधून जौनपूरला जावं लागलं असे आरोप केलेत. तसंच आपल्या पत्नीने केलेले आरोप फेटाळत उलट तीच माझ्याकडून अनैसर्गिक संबंध ठेवण्याची मागणी करायची असं म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT