Crime: ऑफिसमध्ये रक्ताचा सडा! बॉसची तलवारीचे वार करत हत्या
बंगळुरूतून (Bengaluru) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका टेक कंपनीतील एमडीची (MD) आणि सीईओची (CEO) निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे.ऑफिसच्या एका माजी कर्मचाऱ्यानेच हे धक्कादायक कृत्य केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
बंगळुरूतून (Bengaluru) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका टेक कंपनीतील एमडीची (MD) आणि सीईओची (CEO) निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे.ऑफिसच्या एका माजी कर्मचाऱ्यानेच हे धक्कादायक कृत्य केल्याची माहिती आहे. हा माजी कर्मचारी थेट तलवार घेऊन ऑफिसमध्ये शिरला आणि त्याने कंपनीच्या सीईओ आणि एमडीवर वार करून त्यांची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परीसरात एकच खळबळ माजली आहे. (ex employee killed company ceo and md with sword in office bengaluru crime story)
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, या कंपनीचे नाव एरोनिक्स आहे. या कंपनीच्या एमडीचे नाव फणींद्र सुब्रमण्यम आणि सीईओ थे वीनू कुमार होते. कंपनीत काम करणारा माजी कर्मचारी फेलिक्सने हा धक्कादायक घटनाक्रम केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जुलैला संध्याकाळी 4 वाजता तलवार आणि चाकू घेऊन माजी कर्मचारी फेलिक्स एरोनिक्सच्या ऑफिसमध्ये दाखल झाला होता. ऑफिसमध्ये घुसताच त्याने फणींद्र आणि वीनूचे केबिन गाठले. केबिनमध्ये घुसताच फेलिक्सने तलवारीने वार करून दोघांची हत्या केली. या घटनेने कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांचे म्हणणे काय?
प्रत्यक्षदर्शी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार, तरूणाच्या तलवारीच्या या हल्ल्यातून फणींद्र आणि वीनूने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. दोघांनीही केबिनच्या बाहेर पडून पळण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र फेलिक्सने त्यांना घेरून त्यांची निर्घृण हत्या केली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Crime : मुंडक कापलं, शरीराचे केले तुकडे, दृश्य बघून पोलिसांना फुटला घाम
या प्रकरणावर डीसीपी लक्ष्मी प्रसाद म्हणाले की, एरोनिक्स इंटरनेट कंपनीचे एमडी फणींद्र सुब्रमण्यम आणि सीईओ वीनू कुमार यांना रूग्णालयात दाखल करताना त्यांचा मृत्यू झाला आहे. माजी कर्मचारी फेलिक्स हा फणींद्रला घेऊन फार रागात होता. या घटनेनंतर फेलिक्स फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. फेलिक्स हा टिक टॉक आणि रिल्स व्हिडिओ बनवण्यात खुप प्रसिद्ध आहे.
माजी कर्मचाऱ्याने का केली हत्या?
पोलिसांना प्राथमिक तपासात अशी माहिती मिळाली की, फेलिक्सने कंपनी सोडल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता. फेलिक्सच्या व्यवसायात एरोनिक्सचे एमडी फणींद्र सुब्रमण्यम आणि सीईओ वीनू कुमार अडथळा आणत होते. याच कारणामुळे फेलिक्स त्यांच्यावर नाराज होता. त्याने अनेकदा फणींद्र सुब्रमण्यम आणि वीनू कुमार यांच्याशी बातचीत करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र यावर काहीच तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे फेलिक्सने सुब्रमण्यम आणि वीनू कुमार यांची निर्घृण हत्या केली. या घटनेने परीसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास आता पोलीस करत आहेत. तसेच आता या प्रकरणात पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश येते की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Crime News : लोकांनी चिडवलं अन् आईच्या प्रियकराला संपवलं, 44 वर्षानंतर…
ADVERTISEMENT