उज्ज्वल आणि नीलूला 'अशी' सुचली देशी पॉर्नची idea, तरुणींना द्यायचे प्रचंड पैसे अन्...

मुंबई तक

Noida Porn Case: नोएडामधील एक जोडपं हे त्यांच्या घरातच पॉर्न व्हिडिओ तयार करायचे. पण त्यांना या सगळ्या पॉर्न व्हिडिओ मॉडेलची कल्पना कोणत्या देशातून मिळाली हे आता समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

उज्ज्वल आणि नीलूला देशी पॉर्नची idea 'या' देशातून सुचली (काल्पनिक फोटो)
उज्ज्वल आणि नीलूला देशी पॉर्नची idea 'या' देशातून सुचली (काल्पनिक फोटो)
social share
google news

Noida Porn Case: नुकतंच नोएडामध्ये अडल्ट व्हिडिओ शूट केल्याचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव नावाचे जोडपे त्यांच्या घरी अडल्ट व्हिडिओ शूट करायचे आणि नंतर ते परदेशात विकत होते, असा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) Subdigi Ventures Private Limited वर छापा टाकला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचे संस्थापक उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव आहेत. जे स्वत:च्या घरी मॉडेल्ससोबत व्हिडिओ शूट करून बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपये कमवत होते. पण अशा पद्धतीने पैसे कमविण्याची कल्पना त्यांना नेमकी कशी आणि कोणत्या देशातून सुचली याबाबतची माहिती आता समोर आली आहे.

असा आरोप आहे की या, जोडप्याने त्यांच्या घरी चित्रित केलेले पॉर्न व्हिडिओ सायप्रसच्या  Technius Limited नावाच्या कंपनीसोबत शेअर केले होते. ईडीच्या मते,  Technius Limited नावाची ही कंपनी Stripchat आणि Xhamster  सारख्या पॉर्न वेबसाइट चालवते.

हे ही वाचा>> उज्ज्वल आणि नीलूने मुलींच्या केलेल्या 3 कॅटेगरी, A कॅटेगरीच्या मॉडेल्स पॉर्न शूटसाठी तब्बल...

परदेशी निधी आणि FEMA चं उल्लंघन

ईडीच्या म्हणण्यानुसार, "जाहिरात, मार्केट रिसर्च यासारख्या सेवांच्या स्वरूपात Subdigi Ventures आणि त्यांच्या संचालकांच्या खात्यांमध्ये नियमितपणे परकीय पैसे येत होते." पण, हे पैसे Xhamster वर स्ट्रीम केलेल्या अडल्ट कंटेंटमधून मिळालेले उत्पन्न असल्याचे मानले जाते. 

ईडीच्या सूत्रांनी सांगितले आहे की हे प्रकरण फेमाच्या उल्लंघनाशी संबंधित आहे. निधीबाबत, ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, हे पैसे अडल्ट कंटेंट सेवेसाठी दिले जायचे, जो भारतात गुन्हा आहे.

या देशातून मिळाली उज्ज्वल आणि नीलूला आयडिया

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे मॉडेलिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींना सोशल मीडियावर लक्ष्य करायचे. या मॉडेल्सना प्रथम जाहिरातींद्वारे भरती करण्यात यायचे आणि नंतर त्यांना मोठ्या कमाईचे आमिष दाखवून आकर्षित केलं जायचं. यानंतर, त्यांना पॉर्न व्यवसायात ढकललं जात होतं.

हे ही वाचा>> Crime : उज्ज्वल-नीलूचा पर्दाफाश! मॉडेलसोबत कसं करायचे 3-4 तास पॉर्न शूटिंग? शेजाऱ्यांनी सगळंच सांगितलं

उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव यांना रशियातून ही कल्पना सुचली असल्याचं तपासात समोर आलं आहे. अडल्ट व्हिडिओंमधून कमावलेल्या पैशांपैकी 25% रक्कम ही मॉडेल्सना देण्यात यायची.

मॉडेल्सना विभागलेलं तीन श्रेणींमध्ये

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वल आणि नीलू यांनी मॉडेल्सना A, B आणि C श्रेणींमध्ये विभागले होते. यापैकी, हाय-प्रोफाइल आणि लोकप्रिय मॉडेल्सना A श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेलं. या मॉडेल्सना लाईव्ह स्ट्रिपिंग आणि एक्सक्लुझिव्ह कंटेंटसाठी मोठ्या प्रमाणात पैसे आकारत. यानंतर B श्रेणीच्या मॉडेल्स या मध्यम-स्तरीय मॉडेल असायच्या, ज्यांनी मर्यादित विशेष कंटेंट तयार केलेला असायचा आणि त्यांची कमाई सरासरी होती. 

तर, कमी लोकप्रिय असलेल्या मॉडेल्सना C श्रेणीत ठेवण्यात आलेलं. त्यांना कमी पैसे दिले जायचे. या मॉडेल्सनी सामान्य अश्लील कंटेंटसाठी काम केलं होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp