Rape Case: सासर्‍याचा सुनेवर बलात्कार, त्यानंतर पतीने… हादरवून टाकणारी घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Muzaffarnagar father in law raped his daughter in law when she narrated her ordeal the husband threw his wife out of the house
Muzaffarnagar father in law raped his daughter in law when she narrated her ordeal the husband threw his wife out of the house
social share
google news

Rape Case Uttar Pradesh Crime: मुझफ्फरनगर: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सासऱ्याने (Father-in-law) आपल्या सुनेवर (Daughter-in-law) बलात्कार (Rape Case) केला आणि तिला धमकी देऊन तो पळून गेला. त्यानंतर सायंकाळी घरी परतलेल्या पतीला पीडितेने झालेली घटना सांगितली. तेव्हा पतीने मदत करण्याऐवजी पत्नीलाच (Wife) मारहाण करून घराबाहेर काढले. ‘आता वडिलांनी तुझ्याशी जबरदस्तीने संबंध ठेवले आहेत, त्यामुळे आता मी तुला माझ्यासोबत ठेवू शकत नाही. कारण आता तू माझ्या बापाची बायको झाली आहेस.’ असं म्हणत पतीने पत्नीला हाकलून दिल्याचं घटना नुकतीच समोर आली आहे. (father in law raped his daughter in law when she narrated her ordeal the husband threw his wife out of the house)

ADVERTISEMENT

वास्तविक, ककरौली पोलीस स्टेशन परिसरातील ग्रामस्थ शफीक (नाव बदलले आहे) यांची मुलगी आफरीन (नाव बदलले आहे) हिचा विवाह 19 ऑगस्ट 2022 रोजी मीरपूर पोलीस स्टेशन परिसरातील गावात झाला होता. लग्नानंतर सासरे शमीम (नाव बदलले आहे) याची सुरुवातीपासूनच आपल्या सुनेवर वाईट नजर होती, असा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. 5 जुलै 2023 रोजी पीडितेच्या सासऱ्याने बळजबरीने आपल्या सुनेला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला.

घरी एकटी पाहून सासऱ्याने गर्भवती सुनेवर केला बलात्कार

पीडितेचा पती जावेद (नाव बदलले आहे) हा त्याची आई अल्फिया (नाव बदलले आहे) हिला डॉक्टरकडे घेऊन गेला असता सासरा शमीम याने आपल्या गर्भवती सुनेवर बलात्कार केला. या घृणास्पद घटनेनंतर बलात्कारी सासऱ्याने घरातून पळ काढला.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Eknath Shinde: ‘आपण बोलून मोकळं व्हायचं ना…’, शिंदे-फडणवीसांचा ‘तो’ VIDEO का होतोय व्हायरल?

पतीने पीडितेला घराबाहेर हाकललं

पीडित महिलेचा आरोप आहे की, जेव्हा तिचा नवरा संध्याकाळी घरी आला तेव्हा तिने तिच्यासोबत झालेला प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर पतीने आपल्या पीडित पत्नीलाच मारहाण करत तिला घरातून हाकलून दिले. ‘आता मी तुला माझ्याजवळ ठेवू शकत नाही, कारण आता तू माझ्या वडिलांची पत्नी झाली आहेस.’ असंही तो यावेळी म्हणाला..

माहेरी जाऊन पत्नीने दिली पोलिसात तक्रार

पतीने घरातून हाकलून दिल्यानंतर त्याच्या पीडित पत्नी ही तिच्या माहेरी परतली. येथे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पीडित पत्नीने 5 सप्टेंबर 2023 रोजी मीरापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपी सासरा आणि पतीविरुद्ध कलम 376, 323 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्नही सुरू केले आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Sangli News : पोहत पोहत मगरीजवळ गेला, अन् लोकांच्या काळजाचा ठोका चुकला

दरम्यान, या प्रकरणात सुरुवातीला तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT