Beed : ‘मुलगी दे नाहीतर कुटुंबच संपवेन’, भोंदू बाबाने गुप्तधनासाठी…
पुण्यात असलेले गुप्तधन काढायचे आहे, यासाठी तुमची 16 वर्षाची मुलगी मला द्या, तिला सजवायचे आहे नटवायचे आहे आणि तिचा बळी द्यायचा आहे. मग गुप्तधन मिळेल, त्यातील काही धन तुम्हाला देतो असे आमिष दाखवले होते.
ADVERTISEMENT
Beed crime news : बीड (Beed) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत गुप्तधनासाठी (Secret Money) भोंदू बाबाने एका बापाकडे त्याच्या 16 वर्षाच्या मुलीची मागणी केली आहे. या मुलीचा बळी देऊन गुप्तधन काढून देतो, असे आमीष दाखवले होते. मात्र बापाने भोंदू बाबाच्या आमिषाला बळी न पडता थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. त्यामुळे भोंदू बाबा विरोधात पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादाराव घोशिर असे या भोंदूबाबाचे नाव आहे. या घटनेने बीडमध्ये खळबळ उडाली आहे. (girl sactifice demand from father for secret money black magic beed crime news)
ADVERTISEMENT
बीड जिल्ह्यातील कोतन या गावातील दादाराव घोशिर या भोंदू बाबाने गावातील भाऊसाहेब गरवकर यांच्याकडे गुप्तधनासाठी धक्कादायक मागणी केली होती. पुण्यात असलेले गुप्तधन काढायचे आहे, यासाठी तुमची 16 वर्षाची मुलगी मला द्या, तिला सजवायचे आहे नटवायचे आहे आणि तिचा बळी द्यायचा आहे. मग गुप्तधन मिळेल, त्यातील काही धन तुम्हाला देतो असे आमिष दाखवले होते. या आमिषासह जर ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुमच्या घरादाराला नष्ट करू अशी धमकी देखील या भोंदू बाबांनी भाऊसाहेब यांनी दिली होती.
हे ही वाचा : Maratha Reservation : ”मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर…”, भाजप आमदाराचा सरकारला मोठा इशारा
भोंदू बाबाच्या या आमिषाला बळी न पडता भाऊसाहेब यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंकर अमळनेर पोलीस ठाण्यात दादाराव घोशिर (भोंदू बाबा ) विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 129/2023 कलम 3 महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वाचलं का?
दरम्यान या घटनेने गुप्तधनासाठी कन्याबळी देण्याचा हा प्रकार तर नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोतन गावच्या गावकऱ्यांनी बैठक घेऊन या संदर्भात पोलीस प्रशासनाला देखील कळवले आहे. मात्र या घटनेमुळे कोतन गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.तसेच या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
हे ही वाचा : Maratha Reservation : ‘…याला संपवायला पाहिजे होता’, सदावर्तेंबद्दल शिंदे गटाच्या आमदाराचे खळबळजनक विधान
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT