Crime: लव्हस्टोरीचा भयंकर शेवट! गर्लफ्रेंडनेच केली बॉयफ्रेंडची हत्या, कारण….

मुंबई तक

ADVERTISEMENT

girlfriend killed boyfriend illegal affair jharkhand palamu crime
girlfriend killed boyfriend illegal affair jharkhand palamu crime
social share
google news

देशात प्रेमप्रकरणातून हत्या करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. श्रद्धा वालकर हत्याकांड असो, दिल्लीतील साक्षी हत्याकांड असो किंवा पुण्यातील दर्शना पवार हत्याकांड असो, या घटनेत याच गोष्टी पुन्हा एकदा अधोरेखीत झाल्या आहेत.आता अशीच एक घटना झारखंडमधून समोर आली आहे. या घटनेत एका प्रेयसीनेच आपल्या प्रियकराची हत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. नेमकी प्रेयसीवर आपल्याच प्रियकराची हत्या करण्याची वेळ का आली? तसेच या घटनेचा नेमका कसा उलगडा झाला आहे? हे जाणून घेऊयात.(girlfriend killed boyfriend illegal affair jharkhand palamu crime)

ADVERTISEMENT

झारखंडच्या पलामू जिल्ह्यात राहणाऱ्या नयनचे त्याच्याच गावात राहणाऱ्या चंदीप भूइया याची पत्नी शोभा देवीसोबत प्रेमसंबंध होते. शोभाचा पती आणि नयन हे दोघेही जेसीबी चालवण्याचे काम करायचे. दोघांमघ्ये चांगली मैत्री देखील होती. याचमुळे नयनची चंदीपच्या बायकोसोबत भेट व्हायची. या भेटीत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पुढे हे प्रेम आणखीणच फुलत गेले आणि दोघांची जवळीक वाढत गेली होती. या प्रेमप्रकरणाची कुणकुण चंदीपच्या कुटुंबियांना लागताच त्यांनी नयनच्या हत्येचा कट रचला होता.

हे ही वाचा : Crime: ऑफिसमध्ये रक्ताचा सडा! बॉसची तलवारीचे वार करत हत्या

चंदीपच्या घरी म्हणजेच शोभाच्या सासरी ही घटना कळताच मोठा वाद झाला होता. घरात शोभाच्या या प्रेमप्रसंगामुळे भाडणे झाली. याच कारणामुळे शोभाचे लग्न देखील तुटण्याच्या मार्गावर होते. पण आपले लग्न वाचवण्यासाठी शोभाने भाऊ पंकज कुमारह नयनच्या हत्येचा कट रचला. प्लॅननुसार पंकज कुमारने नयना फुस लावून त्याला बरसौता परिसरात आणले. आणि या ठिकाणी त्याची हत्या करून त्याचा मृतदेह नदी किनारी दफन केला. हा हत्याकांड घडवून शोभा आणि तिचे पती छत्तीसगढला पळून गेले होते.

हे वाचलं का?

दरम्यान नयनच्या हत्येनंतर त्याच्या कुटुबियांनी शोभा आणि तिच्या पतीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल नंबरच्या आधारे शोभाच्या लोकेशनचा शोध घेतला असता, ते दोघेही रायपूरमध्ये असल्याचे आढळले. पोलिसांनी तत्काळ पोलीस पथक रवाना करून छतरपूरवरून दोघांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी शोभाची कसून चौकशी केली असता तिने संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

दरम्यान शोभाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी खोदकाम केले असता, त्यांना एक मृतदेह सापडला. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.त्याचबरोबर पोलिसांनी शोभा आणि पंकज कुमारला अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परीसरात एकच खळबळ माजली आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Delhi Crime : मुंडक कापलं, शरीराचे केले तुकडे; दृश्य बघून पोलिसांना फुटला घाम

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT