‘वहिनी’च्या प्रेमात झाला वेडापिसा, चिकन खायला देऊन बायकोचा काढला काटा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

husband affair with sister in law killed wife feeding drugs with chicken crime story up jhansi
husband affair with sister in law killed wife feeding drugs with chicken crime story up jhansi
social share
google news

देशभरात अनैतिक संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्या आहेत. या वाढत्या अनैतिक संबंधामुळे गु्न्ह्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. अशीच एक घटना आता उत्तर प्रदेशच्या झांसीमधून समोर आली आहे. या घटनेत अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पतीने बायकोला जेवणातून बेशुद्धीचे औषध देऊन त्यांनंतर तिची हत्या केली आहे. या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला आहे. पोलिस आरोपी पतीच्या मागावर आहेत. (husband affair with sister in law killed wife feeding drugs with chicken crime story up jhansi)

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण झांसीच्या प्रेमनगर ठाणे हद्दीतील आहे. संजीव रायकवार पत्नी रेखा रायकवार आणि 5 मुलांसोबत राहत होता. यामध्ये रेखाचे पती संजीव रायकवार सोबत सतत भांडणे व्हायची. पती संजीव याचे वहिनीसोबत अनैतिक संबंध असल्या कारणामुळे त्यांच्यात कडाक्याची भांडणे व्हायची. पती संजीव यांच्या वहिनीसोबतच्या अनैतिक संबंधाच्या नात्याला रेखा यांचा विरोध होता. याच संबंधांमुळे संजीव आणि रेखामध्ये नेहमी भांडणे व्हायची.

हे ही वाचा : आजी नातवाच्या मृतदेहाला सलग 10 दिवस घालत होती आंघोळ, बदलायची कपडे!

चिकनमध्ये औषध मिसळलं

महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संजीव घरी येत असल्या कारणाने रेखाने चिकन बनवलं होते. यानंतर संजीव त्याच्या वहिनीला भेटायला निघून गेला होता. ही गोष्ट रेखाला कळताच तिने वहिनीचे घर गाठले होते. यानंतर वहिनीच्या घरी संजीव आणि रेखामध्ये भांड़णे झाली. या भांडणानंतर दोघेही पती-पत्नी घरी येऊन देखील भांडायला लागले. या भांडणानंतर रेखा नाराज होऊन तिच्या रूममध्ये निघून गेली. याचाच फायदा उचलून संजीव यांनी रेखाने बनवलेल्या चिकनमध्ये औषध मिसळले होते.

हे वाचलं का?

पत्नीवर चाकु हल्ला

रेखा चिकन खाऊन बेशुद्ध झाल्यानंतर संजीवने चाकूने तिची हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर संजीवने घटनास्थळावरून पळ काढला होता. या घटनेची माहिती महिलेच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी तत्काळ रेखाला झांसी मेडीकल कॉलेजमध्ये दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. पोलिसांनी या प्रकरणी घटनास्थळाची पाहणी करून रेखाचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच पोस्टमार्टम रिपोर्टसाठी मृतदेह पाठवला आहे. पोलिसांनी आता या प्रकरणी संजीवचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

हे ही वाचा :  Pune, MPSC: आधी दर्शना पवारला क्रूरपणे मारलं, आता राहुल हांडोरे म्हणतो; मला…

मृत रेखाचा भाऊ धर्मेंद्रने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने भाजीत औषध मिसळून बहिणीला खाऊ घातले. ही भाजी खाऊन ज्यावेळेस ती बेशुद्ध झाली, तेव्हा आरोपीने चाकुने तिची हत्या केली. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच आरोपीचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. या संबंधातून ही हत्या झाल्याचा संशय असल्याचे एसपी सीटी ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी म्हटले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT