Crime : मोबाईलमधील अश्लील फोटोमुळे आत्महत्येचं उलगडलं गूढ; सांताक्रुझमधील ‘ते’ प्रकरण काय?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Mumbai Sextortion Case : मुंबईच्या सांताक्रुझमध्ये (Santacruz) ऑगस्ट महिन्यात एका तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.सुरुवातीला हे प्रकरण पोलिसांना (Police) आत्महत्येचे (Suicide( वाटले होते. मात्र घटनेचा सखोल तपास केला असता, पोलिसांना मृत तरूणाच्या स्मार्टफोनमध्ये त्याचेच अश्लील फोटो आणि मॉर्फ केलेले व्हिडिओ आढळले होते. त्यामुळे हे प्रकरण सेक्सटॉर्शनचे असल्याचा पोलिसांना दाट संशय होता. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास केला असता घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात आता तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे.(mumbai suicide case man was victim of sextortion case three arrested)

ADVERTISEMENT

गेल्या 9 ऑगस्टला म्हणजेच साधारण दोन महिन्यापुर्वी मानसिंग पवार या तरूणाने गुरुद्वारातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. एका प्रार्थनास्थळी एका तरूणाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलिसांनी सुरूवातीला अपघाती मृत्यूची नोंद करून तपास करायला सुरूवात केली होती. या तपासा दरम्यान पोलिसांनी मानसिंग पवारचा मोबाईल ताब्यात घेऊन त्यातून काही धागेदोरे हाती लागतात का? याचा तपास सुरू केला.

हे ही वाचा : IND vs SA : जडेजाचा ‘पंच’, आफ्रिकेचं लोटांगण! ‘इंडिया’ने असा साकारला अविस्मरणीय विजय

पोलिसांनी यावेळी मानसिंगचा स्मार्टफोन तपासला असता त्यामध्ये त्यांना काही अश्लील फोटो आणि मॉर्फ केलेले व्हिडिओ आढळले होते. हे व्हिडिओ आरोपींनी त्याला व्हाट्सअॅपवर पाठवले होते. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपींकडून मानसिंगला देण्यात आली होती. तसेच ही धमकी देऊन आरोपींनी मानसिंगकडून 56 हजार रूपये उकळले होते. विशेष बाब म्हणजे दिल्ली सीबीआयचा अधिकारी असल्याचे भासवत मानसिंगला गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून आणखीण खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न सुरु होता. या प्रकरणी मानसिंगच्या पत्नीने सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे वाचलं का?

पोलिसांना या घटनेचा तपास करत असताना यामध्ये सेक्सटॉर्शन प्रकार असल्याचा दाट संशय होता. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून खंडणीसाठी वापरण्यात आलेली बँक खाती, मोबाईल क्रमांक आणि इतक पुराव्यावरून राजस्थानच्या डिग जिल्ह्यातून तोहिद जाफर अली (22), वारीस जाफर अली (19) यासह एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.तसेय या आरोपींकडून पाच मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

हे ही वाचा : Ajit Pawar : ”माझ्या डोळ्यादेखत अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं”

दरम्यान पोलिसांनी आरोपींचा कसून तपास केला असता त्यांनी घटनेची उकल केली. तसेच आरोपींनी याआधी देखील अनेकांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT