Shiv Sena UBT: ठाकरेंच्या Shiv Sena शहरप्रमुखाचा कोथळाच काढला, हत्येने खळबळ
चंद्रपुरात प्रजासत्ताक दिनाच्याआधीच शहरात ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखाची भोसकून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर हत्या का केली याची चौकशी केली जात असून शिवची वझरकरची हत्या केल्याने अनेक वाहनांची तोडफोड केली आहे.
ADVERTISEMENT
Chandrapur Crime: विकास राजूरकर, चंद्रपूर: देशासह राज्याभरात प्रजासत्ताक दिनाचे उत्साही वातावरण असतानाच चंद्रपूरमध्ये मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे.चंद्रपूरातील ठाकरे गटाचे युवासेना (Yuvasena) शहरप्रमुखाची हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना 25-26 जानेवारीच्या मध्यरात्री घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. युवासेना शहरप्रमुख शिव वझरकरची रात्री उशिरा हत्या (Murder) झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून अरविंदनगर भागातील स्वप्नील काशीकर या मित्राच्या कार्यालयाजवळच शिव वझरकरचा मृतदेह आढळून आल्याचे सांगण्यात आले.
ADVERTISEMENT
बोलवून केली हत्या
युवासेना शहरप्रमुख असलेल्या शिव वझरकर आणि आणखी तिघांचे गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. त्या वादामुळेच त्यांनी शिव वझरकरला भोसकल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 25 जानेवारी रोजी शिवला तिघांनी बोलवून घेतले होते. बोलवलेल्या ठिकाणी शिव वझरकर आल्यानंतर त्याची भोसकून हत्या करण्यात आली. शिवची हत्या झाल्याचे समजताच त्याच्या मित्रांनी आणि कार्यकर्त्यांनी परिसरात लावलेल्या वाहनांची आणि जेसीबीची तोडफोड केली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
हे ही वाचा >> Manoj जरांगेंच्या ‘त्या’ मागणीनंतर छगन भुजबळ आक्रमक, सरकारला थेट दिली धमकी!
काही तासातच बेड्या
शिव वझरकरची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र पोलिसांनी काही तासात ही हत्या कोणी केली त्याचा तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या. या प्रकरणी फरार झालेले आरोपी स्वप्नील काशीकर, हिमांशू कुमरे आणि चैतन्य आस्कर या तिघांना पोलिसांनी रात्री अटक केली आहे. या हत्येचा तपास रामनगर पोलीस करत असून त्याची हत्या का करण्यात आली त्याचा पोलीस तपास करत आहेत.
हे वाचलं का?
किरकोळ वाद
पोलिसांनी आरोपींनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितले की, आपापसातील किरकोळ वादातून शिव वझरकरची हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर परिसरात ताणतणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
वाहनांची तोडफोड
शिव वझरकर हा त्याच्या आई वडिलांना एकुलता एक होता, मात्र भेटायला बोलवून त्याच्यावर धारधार शस्त्राने वार करत भोसकून त्याची का हत्या करण्यात आली ते मात्र अजून स्पष्ट झाले नाही. मात्र त्याच्या मृत्यूमुळे संतप्त कार्यकर्त्यांनी अनेक वाहनांची तोडफोड केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Ram Mandir : गर्भगृहात स्थान न मिळालेल्या रामलल्लाच्या ‘त्या’ दोन मूर्ती, कुठे पाहायला मिळणार?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT