Maharashtra New CM: भाजपचं ठरलं, 'या' नावावर होणार शिक्कामोर्तब... शिंदेंचा पत्ता कापला जाणार?
Maharashtra New CM and Devendra Fadnavis: भाजपने आपलाच मुख्यमंत्री करायचा असं ठरवल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंची नेमकी काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
भाजप पुढील 48 तासात जाहीर करणार मुख्यमंत्री पदासाठीचं नाव
भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याची सूत्रांची माहिती
एकनाथ शिंदेंचा पत्ता कट होणार?
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या निकाल लागून आता तीन दिवस झालेले आहेत. मात्र, अद्यापही महायुतीने आपला मुख्यमंत्री कोण हे जाहीर केलेले नाही. पण येत्या 48 तासात भाजप मुख्यमंत्री कोणाला बनवणार याबाबत आपला निर्णय जाहीर करणार असल्याचं समजतं आहे. यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह भाजपचे दोन निरीक्षक हे महाराष्ट्रात येणार आहेत.
ADVERTISEMENT
29 नोव्हेंबरला भाजपच्या नेता निवडीची बैठक ही पार पडणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कोणती मंत्रिपदं द्यावी यावर देखील राजधानी दिल्लीत बरीच खलबतं झाली असल्याची माहिती आता समोर आली आहे.
हे ही वाचा>> Amol Mitkari Vs Naresh Arora : अजितदादांच्या खांद्यावर 'नरेश अरोरांचा' हात, मिटकरींचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, काय आहे वाद?
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब?
राज्यात 133 जागांसह भाजप हा सर्वात मोठा ठरला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आपलाच व्हावा यासाठी भाजपचे आमदार आणि पदाधिकारी हे खूपच आग्रही आहेत. अशावेळी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाचे भाजपमधील प्रमुख दावेदार आहेत.
हे वाचलं का?
हे ही वाचा>> Jitendra Awhad : गावात एकूण मतदार 396, पण मतदान झालं 624, इव्हीएममध्ये गडबड? गणित सांगत आव्हाडांचा सवाल
त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देखील देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कमोर्तब केलं असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे.
शिंदेंच्या 'त्या' ट्वीटमुळे चर्चेला उधाण
"महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील."
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदेंच्या या ट्वीटमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आलं आहे. भाजपकडे 133 जागा असल्याने ते कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री पद हे स्वत:कडे घेणार असल्याचं बोललं जात आहे. अशावेळी मुख्यमंत्री पदावर असलेल्या एकनाथ शिंदे यांचं नेमकं काय होणार किंवा ते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT