Solapur Crime: दहावीतील विद्यार्थ्याने नववीतील मुलाकडून 10 लाख कसे उकळले?
सोलापूर शहरात एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून तब्बल एक लाख रुपये उकळल्याचा प्रकार घडला आहे.
ADVERTISEMENT
Solapur Crime News : लहान वयातील मुलांमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचा प्रत्यय देणाऱ्या अनेक घटना दररोज समोर येत आहे. सोलापूरमध्येही पालकांना चिंतेत टाकणारी एक घटना घडली आहे. एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून 10 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आलाय. हा सगळा प्रकार पोलिसांनी ऐकल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला.
ADVERTISEMENT
सोलापूर शहरातील जोडभावी परिसरात एक कुटुंब वास्तव्यास आहे. त्या कुटुंबातील नववीत शिकणारा मुलगा घरातून पैसे घ्यायचा. शिक्षिका असलेल्या आईला त्यांच्या वडिलांनी निवृत्तीच्या रकमेपैकी पाच लाख रुपये दिले.आईने त्यात भर घालून लॉकरमध्ये 11 लाख 25 हजार रुपये ठेवले होते. त्याला खाण्यापिण्याचं सवय होती. त्याच्याकडे पैसे बघून एक 17 वर्षाचा दहावीत शिकणाऱ्या मुलाने त्याला पैसे मागितले. सुरूवातीला दोनशे रुपये मागितले. नववीतील मुलाने त्याला दिले.
हा पैसे देत गेला, तो गेला… काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या विधीसंघर्षग्रस्त मुलाने नंतर त्याला वारंवार पैसे मागण्यास सुरुवात केली. नववीतील मुलगा त्याला पैसे देत गेला. पैसे उकळण्यास अशी सुरुवात झाली. त्यानंतर दहावीतील मुलाने नववीतील मुलाला मारहाण करण्यासही सुरुवात केली.
हे वाचलं का?
आईवडिलांना मारून टाकू
नववीतील विद्यार्थ्याकडे भरपूर पैसे असल्याचा अंदाज आल्यानंतर दहावीतील विद्यार्थ्याने त्याला धमकी देण्यास सुरुवात केली. पैसे दिले नाही, तर तुझ्या आईवडिलांना मारून टाकू अशी धमकी त्याने दिली. अशा धमक्या देत, तो त्याच्याकडून कधी पाच हजार, तर कधी दहा हजार असे पैसे घेत गेला. नंतर नंतर पन्नास हजारही तो उकळायला लागला.
वाचा >> एकनाथ शिंदेंचे खास, पण अजितदादांच्या एंट्रीनं होणार गेम, गादी जाणार?
ज्यावेळी मुलाने त्याच्या बहिणीच्या नवऱ्याला सांगितलं. तेव्हा त्यानेही 2 लाख रुपये उकळले. त्याच्याकडून त्यानंतर कधी तुला मारून टाकतो म्हणत, तर कधी तुझ्या आईवडिलांना संपवतो म्हणत त्यांनी जवळपास दहा लाख रुपये उकळले.
ADVERTISEMENT
वाचा >> Exclusive: ‘समोर भीष्माचार्य असले तरी बाण…’, बंडानंतर अमोल मिटकरी आता शरद पवारांना भिडणार!
फिर्यादी यांनी सहा महिन्यानंतर कपाटातील रक्कम तपसली असता, अकरा लाखांऐवजी फक्त एक लाख रुपये आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी दहावीतील एक मुलगा व नातेवाईक आकाश खेड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती जोडभावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT