Crime : अकोला हादरलं! आधी प्रेयसीचा गळा चिरला मग स्वत:ला संपवलं
अनिल तायडेने चाकू काढून शोभना हिच्या गळ्यावर सपासप वार केले. अनिल इतक्यावरच थांबला नाहीतर त्याने तिच्या पायावर आणि पोटावर देखीन चाकूचे गंभीर वार केले. त्यामुळे शोभना लांडे रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.
ADVERTISEMENT
Akola Crime News : धनंजय साबळे, अकोला : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका घरात एका महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या हत्येनंतर एका व्यक्तीने स्वत:ला संपवण्याचा देखील प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे महिलेच्या (Women Killed) हत्येपूर्वी दोघांमध्ये भांडणे झाली होती. अखेर हे भांडणं इतक्या टोकाला पोहोचलं की त्याने तिचा जीवच घेतला होता. या घटनेने सध्या अकोला हादरलं आहे. दरम्यान नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात. (akola crime news man killed 36 year old girl friend and then killed herself crime news)
ADVERTISEMENT
मुर्तीजापुर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोट तालुक्यातील लोहारी येथील रहिवासी असलेला अनिल तायडे (वय 45) याचा शोभना लांडे (वय 36) या महिलेसोबत प्रेमसंबध होते. अनिल हा कित्येकदा शोभनाला भेटायला माना येथे यायचा. तसेच तो तिच्यासोबत फोनवरून देखील संपर्कात होता. या दरम्यानच दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र मधल्या काळात दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता आणि वादही झाला होता.
हे ही वाचा :Maratha Reservation : ‘जरांगेना मुंबईत येण्याचा अधिकार नाही’, गुणरत्न सदावर्ते असं का म्हणाले?
दरम्यान 23 जानेवारीला मंगळवारी दुपारी वस्तीतील सर्व महिला, पुरुष कामावर गेले असताना व्यक्ती अनिल तायडे शोभनाच्या घरी आला होता. घरी आल्यानंतर अनिल तायडेने शोभनाकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र शोभना हिने नकार देताच अनित तायडे तिच्यावर प्रचंड वैतागला. आणि यातूनच दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. हे भांडण पुढे जाऊन इतक्या टोकाला पोहोचले की, अनिल तायडेने चाकू काढून शोभना हिच्या गळ्यावर सपासप वार केले. अनिल इतक्यावरच थांबला नाहीतर त्याने तिच्या पायावर आणि पोटावर देखीन चाकूचे गंभीर वार केले. त्यामुळे शोभना लांडे रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.
हे वाचलं का?
दरम्यान शोभना मृत झाल्याचे समजताच अनिल तायडेने देखील स्वत:चा गळा कापून आत्महत्या केली. या संपूर्ण घटने दरम्यान दोघांमध्ये जोरजोरात भांडण होत असल्या कारणाने स्थानिकांना .या घटनेची माहिती मिळाली होती. त्यात अचानक भांडण बंद झाल्याने स्थानिकांना संशय आला आणि त्याने घरात पाहिले असता दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
हे ही वाचा :NCP : रोहित पवारांमागे ईडीचा ससेमिरा सुरूच! 12 तासांच्या चौकशीनंतर पुन्हा समन्स
स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने अनिल तायडे याला तात्काळ मूर्तिजापूर येथील सरकारी दवाखान्यात भरती केले. मात्र त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.सध्या तो मृत्यूशी झुंज देतोय.तसेच पोलिसांनी शोभनाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम रिपोर्टसाठी पाठवला आहे. तसेच या प्रकरणी माना पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सूरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT