Crime news : …म्हणून गर्लफ्रेंडचा मोबाईल केबलनेच घोटला गळा अन् अंगणात फेकला मृतदेह

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

boyfriend killed his girlfriend shocking crime story manipuri uttar pradesh
boyfriend killed his girlfriend shocking crime story manipuri uttar pradesh
social share
google news

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मैनपूरीमधून (manipuri) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 19 वर्षीय तरूणीची हत्या करून तिचा मृतदेह तिच्याच घराबाहेर फेकल्याची हादरवून टाकणारी घटना घडली आहे. 24 जुलैला हत्येची ही घटना घडली आहे. या हत्येच्या दुसऱ्या दिवशी ही घटना उघडकीस आली होती. कुटुंबियांनी घराबाहेर मृतदेह पाहताच त्यांना मोठा हादराच बसला. कुटुंबियांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. यानुसार पोलिसांनी (Police) आता या घटनेचा तपास सुरु केला आहे. (boyfriend killed his girlfriend shocking crime story manipuri uttar pradesh)

ADVERTISEMENT

प्रेमप्रकरणातून हत्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशाच स्वरूपाची ही घटना आहे. किसनी पोलिस ठाणे हद्दीतील फतेहपूर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत 19 वर्षीय मृत तरूणी अजय चौहान नावाच्या तरूणासोबत नात्यात होती. गेल्या साधारण सात महिन्यापासून दोघेही प्रेमात होते.

हे ही वाचा :  प्रेम, अपहरण आणि गँगरेप… गर्लफ्रेंडच्या अब्रूचे मित्रांसोबत महिनाभर तोडले लचके

या दरम्यानच मृत तरूणीला लग्नाची स्थळ येत होती. कुटुंबियांनी तिचे लग्न एका ठिकाणी ठरवून देखील टाकलं होते. या भेटी दरम्यानच अजयने तरूणीला लग्नासाठी विचारले. तरूणीने जसा त्याला नकार देताच, अजयने मोबाईल डाटा केबल काढूल तिचा गळा आवळला. तरूणीची हत्या करून आरोपीने नंतर तिचा मृतदेह तिच्याच घराबाहेर फेकला होता. हा संपूर्ण हत्येची घटना केल्यानंतर आरोपीने घटना स्थळावरून पळ काढला होता.

हे वाचलं का?

घटनेच्या दुसऱ्या दिवशी कुटुंबियांनी 25 जुलैला आपल्याच मुलीचा मृतदेह घराबाहेर सापडला होता. आणि त्यांना मोठा धक्का बसला. यानंतर कुटुंबियांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम रिपोर्टसाठी पाठवला.या प्रकरणात पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्सच्या आधारावर आरोपी अजयला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

हे ही वाचा :  Mumbai : डब्यात घुसला, जबरदस्ती अन् धावत्या ट्रेनमधून महिलेला दिलं ढकलून

दरम्यान महाराष्ट्राच्या पुण्यात देखील अशीच घटना समोर आली होती. या घटनेत एमपीएससी परीक्षेत राज्यातून तिसऱ्या आलेल्या 26 वर्षीय दर्शना पवार हिची हत्या करण्यात आली होती. राजगड किल्याच्या पायथ्याची दर्शना पवारचा मृतदेह सापडला होता. दर्शना पवारने लग्नास नकार दिल्याने आरोपीने तिची हत्या केली होती. आरोपी राहूल हंडोरेने तरूणीची हत्या करून पळ काढला होता. या दरम्यान आरोपीने मुंबईसह अनेक परीसरात ट्रेनने प्रवास करून पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न केला होता.मात्र अखेर मुंबईच्या अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीला अटक करण्यात आले होते. या संपूर्ण घटनाक्रमाने महाराष्ट्र हादरला होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT