वापरलेले कंडोम सापडले अन् पोलिसांनी 'त्या' गुन्ह्यात आई-मुलाला केली अटक!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आई आणि मुलाला पोलिसांनी केली अटक

point

वेश्या व्यवसाय प्रकरणी करण्यात आली अटक

point

अमेरिकेतील फ्लोरिडामधील घटना

फ्लोरिडा: आई आणि मुलाचे नाते हे जगातील सर्वात प्रेमळ नाते आहे. हे नाते अत्यंत निर्मळ असं असतं. पण आई आणि मुलाच्या जोडीने या नात्यालाही लाजवेल असा एक भयंकर अपराध केल्याचं आता समोर आलं आहे. (mother and son arrested for prostitution were running business worth crores in the name of real estate)

ADVERTISEMENT

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एक अशी घटना घडली की, ज्यामुळे एकच खळबळ माजली आहे. फ्लोरिडातील एक महिला आणि तिचा मुलगा हा तब्बल 25 वर्षांपासून वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवत होता आणि पोलिसांना त्याबाबत काहीच सुगावा लागला नव्हता. आई आणि मुलगा एवढे हुशार होते की, पोलिसांच्या ते अजिबात कचाट्यात सापडत नव्हते. पोलिसांना त्यांच्यावर अनेकदा संशय आला, पण पुराव्याअभावी ते मोकाट सुटत होते.

हे ही वाचा>> शरद पवारांपासून दूर का झालात? त्यांनी तुम्हाला फसवलं का? सुनील तटकरेंनी सांगितली A to Z स्टोरी

कसे काढत होते कायदेशीर पळवाटा?

फ्लोरिडामध्ये वेश्याव्यवसाय बेकायदेशीर आहे. वेश्याव्यवसाय-संबंधित गोष्टी करणं, त्यांच्या सेवांसाठी पैसे देणे आणि दलाली करणं हे सर्व फ्लोरिडा कायद्यानुसार बेकायदेशीर आहेत. त्यामुळेच आई आणि मुलाने एस्कॉर्ट्स पुरविण्याच्या नावाखाली स्वतःची कंपनी सुरू केली होती. तिचे नाव होते 'प्रिटी वुमन एस्कॉर्ट्स' यातून जे काही पैसे कमावले जात होते जे रियअ इस्टेटच्या माध्यमातून 'व्हॉईट मनी' म्हणून वापरले जात होते. जगाच्या नजरेत हे रियल इस्टेट एजंट होते.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> शरद पवारांपासून दूर का झालात? त्यांनी तुम्हाला फसवलं का? सुनील तटकरेंनी सांगितली A to Z स्टोरी

पोलिसांना त्यांच्यावर संशय होता, मात्र त्यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा सापडत नव्हता. मग एके दिवशी पोलिसांनी त्यांच्या येथील कचऱ्याची तपासणी केली, जिथे त्यांना वापरलेले कंडोम, ग्राहकांची यादी आणि काही एस्कॉर्ट्सचे मोबाइल नंबर सापडले. त्यानंतर पोलिसांनी त्या एस्कॉर्ट्सना पकडले, ज्यांच्या खुलाशामुळे आरोपी आई आणि मुलाच्या या संपूर्ण काळ्या धंद्याची पोलिसांना माहिती मिळाली. जेव्हा पोलिसांनी कोट्यवधी रुपयांची कमाई नेमकी कशी झाली याबाबत चौकशी सुरू केली तेव्हा ही सर्व कमाई 'प्रिटी वुमन एस्कॉर्ट्स'च्या माध्यमातून झाल्याचे त्यांना आढळून आले.

यानंतर पोलिसांनी एक-एक पुरावे जोडण्यास सुरुवात केली. पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. दरम्यान, 48 वर्षीय ख्रिस्तोफर जेलाविक आणि त्यांची 70 वर्षीय आई मार्गारेथा वॉन देश सोडून जाण्याच्या तयारीतच, मात्र पोलिसांनी त्यांना विमानतळावरच अटक केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT