Mumbai Crime : प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये 7 तुकडे! डोकं, हात-पाय अन्... मुंबईत भयानक कांड!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गोराई बीच परिसरातील जंगलात एका अज्ञात व्यक्तीचा तुकड्यांमध्ये मृतदेह

point

नेमकं प्रकरण काय? 

point

गोराई पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल

Dead Body Found in Gorai Beach Jungle : मुंबईत गोराई बीच परिसरातील जंगलात एका अज्ञात व्यक्तीचा तुकड्यांमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह एकूण 7 तुकड्यांमध्ये सडलेल्या अवस्थेत सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. गोराई पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. (mumbai crime news gorai beach jungle dead body found in 7 parts in plastic containers at gorai mumbai)

महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाच्या जंगलसदृश भागात हा मृतदेह सापडला. या मृतदेहाचे डोके, हात-पाय आणि धड वेगवेगळे करण्यात आले होते. मृतदेहाचे एकूण 7 तुकडे सापडल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. हा मृतदेह नेमका कुणाचा आहे याचा पोलीस तपास करत आहेत. 

हेही वाचा : Shahaji Bapu Patil: '...म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंना सहन करतोय', शहाजीबापूंचं मोठं विधान!

नेमकं प्रकरण काय? 

गोराईच्या बाबर पाडा येथील पिक्सी रिसॉर्टला जाणाऱ्या रस्त्यावर शेफाली नावाच्या एका गावाजवळ काही दिवसांपासून दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता त्यांना जे आढळलं ते थरकाप उडवणारं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गोराई बीज येथे असलेल्या जंगल परिसरात झुडपांमध्ये नागरिकांना एक गोणी आढळली. यामध्ये मृतदेह असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना तातडीने याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी ही गोणी उघडली तेव्हा त्यामध्ये प्लॅस्टिकच्या डब्यात विविध अवयव भरुन ठेवल्याचे आढळून आले. या मृतदेहाचे एकूण सात तुकडे करण्यात आले होते. या घटनेमुळे गोराई परिसरात खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा :  Govt Job : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत नोकरीची संधी! अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

याप्रकरणी गोराई पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गोणीत सापडलेल्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. जेणेकरुन पुढील माहिती मिळवण्यास मदत होईल. या व्यक्तीची हत्या कोणी केली असावी, त्याचे कारण काय असावे, या सगळ्याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरु आहे.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT