Renu Sinha: रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मृतदेह, सुप्रीम कोर्टातील वकिलाची कुणी केली हत्या?
उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 61 वर्षीय महिला वकील रेणू सिन्हा यांच्या हत्येची घटना रविवारी घडली होती.या हत्येनंतर एकच खळबळ उडाली होती. या हत्या प्रकरणात आता पोलिसांनी सोमवारी आरोपी पती आणि आयआरएस (IRS) ऑफिसर नितीन सिन्हाला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
Renu Sinha Murder Noida Uttar Pradesh : उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 61 वर्षीय महिला वकील रेणू सिन्हा (Renu Sinha) यांच्या हत्येची घटना रविवारी घडली होती.या हत्येनंतर एकच खळबळ उडाली होती. या हत्या प्रकरणात आता पोलिसांनी सोमवारी आरोपी पती आणि आयआरएस (IRS) ऑफिसर नितीन सिन्हाला अटक केली आहे. आरोपी नितीन सिन्हा (Nitin Sinha) हे हत्येनंतर बंगल्याच्या स्टोअररूममध्ये लपले होते. यावेळी रात्री 3 वाजता स्टोअररूम मधून बाहेर पडताच पोलिसांनी त्यांना अटक केली. या हत्याकांडानंतर नितीन सिन्हा यांनी पत्नी रेणू सिन्हा यांची हत्या का केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे हे सपूर्ण घटनाक्रम काय आहे? हे जाणून घेऊय़ात.(renu sinha death case supreme court advocate husband arrested from store room noida uttar pradesh story)
ADVERTISEMENT
नोएडाच्या सेक्टर 30 मधील डी40 बंगल्यात राहणाऱ्या रेणू सिन्हा या सर्वोच्च न्यायालयात वकील होत्या. रेणू सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टीस करायच्या. गेल्या काही दिवसापासून रेणू यांची बहिण त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र रेणू या फोनच उचलत नव्हती. त्यामुळे तिने रेणूच्या नवऱ्याला फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने देखील फोन उचलला नाही. त्यामुळे रेणूच्या बहिणीला तिची काळजी वाटू लागली,त्यामुळे तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
हे ही वाचा : Raju Patil : मनसे आमदाराने भाजपची उडवली खिल्ली; पाटील म्हणाले, ‘एक पीआय…’
पोलिसांनी तत्काळ रेणूच्या बंगल्यावर धाव घेतली. यावेळी बंगल्यातील बाथरूममध्ये रेणूचा मृतेदह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांनी यावेळी तत्काळ मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. या घटने दरम्यान रेणू यांचा पती नितीन सिन्हा हा बेपत्ता होता. त्यामुळे संशयाची सुई आपोआप नितीन सिन्हावरच जात होती. त्यामुळे पोलिसांना नितीन सिन्हा शोध सुरु केला होता.
हे वाचलं का?
आरोपीला बंगल्यातून अटक
रेणू सिन्हा यांच्या हत्येनंतर पती नितीन सिन्हा हा फरार होता. खरं तर नितीन हा बंगल्याच्या स्टोररूममध्ये लपला होता. सोमवारी पहाटे 3 वाजता तो बंगल्यातून बाहेर पडला होता. यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली. आता पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करायला सुरुवात केली आहे.
पोलीस चौकशीत काय म्हणाला?
नितीन सिन्हाला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली. या चौकशीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. रेणू कॅन्सर आजाराने त्रस्त होती. तिच्यावर उपचार सुरू होती. आणि महिन्याभरापूर्वीच तिने कॅन्सरशी यशस्वी झुंज दिली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Maratha Reservation : ओबीसींच आरक्षण कमी होणार? देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले…
रेणू आणि नितीन सिन्हामध्ये प्रॉपर्टीवरून वाद सुरू होते. नितीनला त्यांचा बंगला 5 करोड 70 लाखांना विकायचा होता. मात्र याला रेणूचा विरोध होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होते. या वादातून धारदार शस्त्राने नितीनने रेणूची हत्या केली होती. त्यानंतर नितीन सिन्हा बंगल्याच्या स्टोअररूममध्ये जाऊन लपला होता. त्यानंतर रात्री स्टोअररूममधून बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलीय
ADVERTISEMENT
दरम्यान आरोपी नितीन सिह हा भारतीय महसूल सेवेचा अधिकारी होता. नंतर त्याने नोकरी सोडली होती. सध्या पोलीसांनी नितीन सिन्हाला अटक करून अधिक चौकशी सुरू केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT