उघड्यावर लघवीला गेला अन् Pit Bull Dog ने वकिलाच्या प्रायव्हेट पार्टवर...

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उघड्यावर लघवीला जाणे पडले महागात! 

point

Pit Bull Dog ने वकिलाच्या प्रायव्हेट पार्टवर केला हल्ला

Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी येथे उघड्यावर लघवीला जाणाऱ्या एका वकिलावर पिट बुल जातीच्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिटबुलने त्या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टलाच चावा घेतला. रक्तबंबाळ झालेल्या वकिलाला आता लखनौच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही बाब संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. (uttar pradesh barabanki news pitbull dog attack on lawyers private part ans scratched horrific result of toilet in open)

उघड्यावर लघवीला जाणे पडले महागात! 

ही घटना 16 जुलै रोजी घडली होती. बाराबंकीच्या कोतवाली भागातील विकास भवनाजवळ राहणारा एक वकील घरी परतत होता. घरी परतत असताना हा वकिल वडिलांना भेटण्यासाठी आवास विकास कॉलनीतील दरियााबाद येथील ब्लॉक प्रमुख आकाश पांडे यांच्या घरी थांबला होता. त्यावेळी लघवीला आल्याने वकील घरालगत असलेल्या मोकळ्या जागेत गेला.

हेही वाचा : Pune Rain: पुण्यात पावसाचा हाहाकार! खडकवासला धरणात विसर्ग वाढवणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

वकिलाचे दुर्दैव ऐवढे होते की, तो लघवीला गेला असताना त्याला पिट बुलने पाहिलं आणि तो त्याच्यापर्यंत पोहोचला. वकिलाने पिटबुलला तेथून हाकलण्याचा प्रयत्न करताच त्याने वकिलाच्या प्रायव्हेट पार्टवरच हल्ला केला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : Maharashtra Rain News: मुसळधार पावसामुळे राज्यात कोणत्या 8 जिल्ह्यातील शाळांना सुट्टी?

या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला होता. लोकांनी ताबडतोब पिट बुल जातीच्या त्या कुत्र्याला पकडून वकिलापासून दूर नेले आणि रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत वकिलाला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. वकिलाची अवस्था पाहून हॉस्पिटलमध्ये उपस्थित डॉक्टरही घाबरले. त्यांना जेव्हा काही सूचेनासे झाले तेव्हा त्यांनी जखमी जागेवर मलम लावून वकिलाला ताबडतोब लखनौला नेण्याचा सल्ला दिला. आता सध्या लखनौमध्ये वकिलावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : Rain Update: रात्र वैऱ्याची... पहाटे 'या' धरणातून आणखी वेगाने सोडणार पाणी!

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, वकिलाला उघड्यावर लघवीला जाण्यास मनाई करण्यात आली होती. कारण, लोकांना माहित होतं की, पिट बुलचा तिथे वावर आहे. पण वकील घाईत असल्याने त्याने या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि हा अपघात त्याच्यासोबत घडला. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, वकिलाला लखनौच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT