Guru Waghmare: 'स्पा'मध्ये हत्या, 'चुलबुल'नं मांडीवर 22 नावं का गोंदवलेली? चक्रावून टाकणारी Inside स्टोरी
Worli Murder Inside Story: वरळीतील स्पामध्ये खून झालेल्या गुरु वाघमारेने स्वत:च्या मांडीवर तब्बल 22 जणांची नावांचे टॅटू काढले होते. जाणून घ्या या हत्येची नेमकी Inside स्टोरी.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुंबईतील गुरू वाघमारे हत्या प्रकरणात नवी माहिती
गुरू वाघमारेने मांडीवर गोंदवलेली 22 शत्रूंची नावं
कुटुंबातील दोन सदस्यांची नावंही शत्रू म्हणून नोंदवलेली
Worli Guru Waghmare Murder: मुंबई: क्राईमच्या घटना आणि त्यातल्या वेगवेगळ्या धक्कादायक बाजू आपण सातत्यानं पाहतच असतो. मात्र वरळीतल्या एका स्पामध्ये झालेल्या मर्डर प्रकरणात चकित करणाऱ्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. वरळीतील स्पामध्ये गुरु वाघमारे याच्या हत्येने मोठी खळबळ उडाली होती. चुलबुल पांडे या नावाने गुरू वाघमारे हा ओळखला जायचा. या हत्या प्रकरणात आता रोज नवनवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणात काही जणांना अटक देखील झाली आहे. यात सर्वात चक्रावणारी एक गोष्ट समोर आलीय ती म्हणजे गुरूने आपल्या 22 शत्रूंची नावे अगोदरच आपल्या मांडीवर गोंदवली होती. त्यामुळे या हत्या प्रकरणाला नवे वळण मिळालं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे हेच सविस्तरपणे जाणून घेऊया. (why did guru waghmare who was murdered in a spa in worli mumbai have 22 names tattooed on his thigh inside story)
ADVERTISEMENT
नेमकी कशी करण्यात आली गुरूची हत्या?
मुंबईतील वरळी नाका येथील सॉफ्ट टच स्पामध्ये गुरु वाघमारेचा मृतदेह आढळून आलेला. धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या करण्यात आली होती. गुरूच्या संपूर्ण शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. ही हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग असल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. गुरूला संपवण्यासाठी सहा लाखाची सुपारी दिल्याची माहिती समोर आलीय तर या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा>> Pune Crime : तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! गर्भवती प्रेयसीचा मृत्यू, नंतर दोन मुलांना जिवंत फेकलं नदीत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विलेपार्ले येथे राहणारा वाघमारे हा वरळी नाका येथे असलेल्या स्पामध्ये नेहमी जायचा. हत्येच्या दिवशी देखील गुरु स्पामध्ये गेलेला, त्यावेळी त्याच्या 21 वर्षीय मैत्रिणीने पार्टीची मागणी केली. यानंतर पाच जणांचा ग्रुप सायनमधील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला. पोलिसांनी सांगितले की, बुधवारी रात्री 12.30 च्या सुमारास ते सर्व हॉटेलमध्ये पार्टी करून स्पामध्ये परतले. काही वेळाने तिघेही तेथून निघून गेले, तर वाघमारे व त्याची मैत्रीण तिथेच थांबल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे वाचलं का?
सुमारे दोन तासांनंतर दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी स्पामध्ये येऊन वाघमारे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हत्येची माहिती पहाटे अडीच वाजता पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता वाघमारे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.
22 शत्रूंची नावं गुरू वाघमारेने गोंदवलेली मांडीवर
खंडणीच्या त्रासाला कंटाळून दोन स्पा मालकांकडून सहा लाखांची सुपारी देऊन गुरुसिद्धप्पा वाघमारेची हत्या केल्याचं समोर आले आहे. मात्र, या हत्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. हत्या झालेल्या गुरू वाघमारेच्या दोन्ही मांड्यावर तब्बल 22 नाव गोंदवली आहेत. माझ्या जीवितास काही बरेवाईट झाल्यास हे लोक जबाबदार असतील असं म्हणून चक्क ही नावे गोंदवली आहेत. आता पोलिसांकडून या 22 लोकांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Nagpur : दोघं OYO मध्ये गेले अन् नग्नावस्थेतच तो आला बाहेर, नागपुरात काय घडलं?
गुरुच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेकडून तीन आरोपी तर वरळी पोलिसांकडून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुरू वाघमारे हा स्पा मालकांना खंडणीसाठी दर महिन्याला त्रास देत होता. गुरूकडून अनेक स्पा मालकांना ब्लॅकमेल केल्याच्या आणि त्रास दिल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. ज्या स्पामध्ये हत्या झाली त्या स्पाच्या मालकाकडून वाघमारे हा आठ ते दहा वर्षापासून खंडणी घेत होता.
ADVERTISEMENT
आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची जाणीव कदाचित गुरु वाघमारेला असावी म्हणूनच की काय आपले शत्रू कधीतरी तरी आपला काटा काढतील अशी शंका गुरूला होती. त्यामुळे त्याने चक्क आपल्या शत्रूंची नावे आपल्या दोन्ही मांड्यावर गोंदवली होती. माझ्या जीवितास काही बरेवाईट झाल्यास हे लोक जबाबदार असतील असे देखील लिहिले. त्यामध्ये हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीचंही नाव आहे.
'माझ्या दुश्मनांची नावे डायरीत नोंद आहेत. चौकशी करून कारवाई करावी' असेही वाघमारेने स्वतःच्या मांडीवर गोंदवले आहे. या 22 नावांमध्ये स्वतःच्याच कुटुंबातील दोन सदस्यांची नाव असल्याचे समोर आले आहे. नावं गोंदवलेल्या यादीत गुरुच्या खुनाची सुपारी दिलेला स्पा मालक संतोष शेरेकरचंही नाव गोंदवण्यात आलं होते. खंडणीखोर गुरुसिद्धप्पा वाघमारेला संतोष शेरेकरकडून याआधीही अनेकवेळा मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अशी सुद्धा माहिती आता समोर आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT