Nashik: ‘खर्चासाठी पैसे देत नाही’; पतीचा काटा काढण्यासाठी बियर पाजली, सर्पदंश देऊन…
Nashik Crime News : नाशिकच्या (Nashik) बोरगड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. माहितीनुसार खर्चासाठी पैसे देत नाही, फिरायला स्वातंत्र्य देत नाही या सर्वाला कंटाळून महिलेने चक्क पतीला संपवण्याचा कट रचला.
ADVERTISEMENT
Nashik Crime News : नाशिकच्या (Nashik) बोरगड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. माहितीनुसार खर्चासाठी पैसे देत नाही, फिरायला स्वातंत्र्य देत नाही या सर्वाला कंटाळून महिलेने चक्क पतीला संपवण्याचा कट रचला. महिलेने आधी पतीला बियर पाजली त्यानंतर साथीदाराच्या मदतीने त्याचा काटा काढण्यासाठी तोंड उशीने दाबून सर्पदंश दिला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित सोनी उर्फ एकता जगतापसह तिच्या दोन अज्ञात साथीदाराविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Women Plan to kill her husband first gave beer then strangulated him with partner and gave him a snake bite)
ADVERTISEMENT
नेमकं घडलं काय?
म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील बोरगड परिसरात आरोपी एकता तिचा पती विशाल पोपटराव पाटीलसह (41) वास्तव्यास होती. शनिवारी (27 जानेवारी) संध्याकाळी साडे सातच्या सुमारास संशयित एकताने तिच्या साथीदारासह मिळून कट रचला. तिने पतीला बिअर पाजली. यानंतर गळा आवळला आणि तोंडावर उशी दाबून धरत साथीदाराच्या मदतीने त्याच्या मानेवर सर्पदंश दिला.
वाचा : BMC: शिंदे-भाजपच्या आमदारांना कोट्यवधी.. ‘मविआ’च्या आमदारांचे हात रिकामेच’!
कसंबसं तावडीतून सुटून विशालने गाठलं रूग्णालय
सुदैवाने विशालने कसंबसं स्वतःला त्यांच्या तावडीतून सोडवत रुग्णालय गाठले आणि वेळीच उपचार घेतल्यामुळे त्याचा जीव वाचला. या प्रकरणी विशालने पत्नी आणि अज्ञाताच्या विरोधात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे. पत्नी एकता व तिचा साथीदार पसार झाले असून पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.
हे वाचलं का?
वाचा : Maha Vikas Aghadi : आंबेडकरांचे काँग्रेससोबत सूर जुळेना! ‘वंचित’ एका अटीमुळे ‘मविआ’तून बाहेरच
विशालने दिलेल्या माहितीनुसार, पत्नी एकताचे नेहमी आर्थिक कारणांवरून त्याच्यासोबत वाद व्हायचे. काही दिवसांपूर्वी ती त्याला सोडून घरातून निघून गेली होती. पण नंतर परत आली.
वाचा : Maratha Reservation: जरांगे भुजबळांवर भडकले, ‘तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तू…’
शनिवारी 27 जानेवारी रोजी एकताने विशालला बिअर आणायला सांगितली. त्याने पैसे नाही असं म्हणत नकार दिला. पत्नीने त्याला बिअर आणण्यासाठी पैसे दिले. तो रात्री हॉलमध्ये बसून बिअर पीत असताना मागच्या दारातून एक अज्ञात व्यक्ती घरात शिरला आणि त्याने विशालचा गळा मागून आवळला. पत्नीने समोरून उशी तोंडावर ठेऊन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. अज्ञाताने सोबत आणणेल्या सॅकमधून विषारी साप काढत विशालच्या मानेवर दंश दिला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT