Ajit Pawar : "...त्यावेळी उभं करू नका; सांगा अजित पवार चले जाव"
Ajit Pawar Latest News : अजित पवार यांनी संजय राऊत यांना सुनावले. राऊत यांनी नवनीत राणांबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अजित पवार संजय राऊतांवर संतापले
नवनीत राणांबद्दल राऊतांनी केलं होतं विधान
अमरावती लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४
Ajit Pawar, Sanjay Raut, Navneet Rana : अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना अजित पवार यांनी संजय राऊतांच्या वादग्रस्त विधानावर संताप व्यक्त केला. त्याचबरोबर मतदारांना महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले. मदत केली नाही, तर उभं करू नका, असेही ते म्हणाले. (Ajit Pawar gets angry on Sanjay Raut Remarks about Navneet Rana)
ADVERTISEMENT
नवनीत राणांना मतदान करा, असं आवाहन करताना अजित पवार म्हणाले की, "तुम्ही असं म्हणाल की, काय हा गप्पा मारतो. उद्याच्याला निवडणुकीत नवनीत राणांना मतं घेईल आणि पहिल्या क्रमांकावरच त्यांचं नाव आहे... तिथे बटणं दाबून घेतल्यावर तिथे म्हणेल की, याचं काम झालं. नाही... आम्ही शब्दाचे पक्के आहोत. तुम्हाला मदत करणार म्हणजे करणारच."
अजित पवार मतदारांना काय म्हणाले?
"उद्याच्याला नाही मदत झाली, तर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला महायुतीच्या वतीने मते मागायला यायचं आहे. त्यावेळी उभं करू नका. सांगा, अजित पवार चले जाव. तू सांगितलं होतं अमरावतीला येऊन मदत करतो म्हणून... कुठे गेली मदत? आचारसंहिता संपल्या संपल्या त्या कामाला लागणार आहे", अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> लोकसभेच्या धामधुमीत ठाकरेंना निवडणूक आयोगाचा मोठा धक्का!
"काही काही लोक चुकीचे आरोप करतात. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. बहुजन समाजातील मदत व्हावी म्हणून सत्तेचा वापर करायचा असतो. तुम्ही शेतकरी, मी शेतकरी. शेतकरी आपली जात आहे", असे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा >> बाबा रामदेव यांना 'सुप्रीम' झटका! द्यावा लागणार सर्व्हिस टॅक्स
अजित पवार संजय राऊतांच्या विधानावर संताप
संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले होते. त्यावर अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
"विरोधक काही वाटेल तशा प्रकारचे आरोप करताहेत. काहीही आमच्या महिलांना बोलताहेत. काहीही आमच्या नवनीत राणांना बोलताहेत. अरे बोलणाऱ्याच्या घरात काय आया बहिणी आहेत की नाही? कुठली पद्धत बोलायची आहे. आपली शिकवण काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण काय आहे? आपण महिलेचा मान ठेवतो, सन्मान ठेवतो", असे म्हणत अजित पवारांनी संजय राऊतांना सुनावलं.
ADVERTISEMENT