Amravati Lok Sabha elections 2024 : राणांना निवडणूक जाणार जड, बच्चू कडू उतरवणार 'भिडू'!
Bachchu kadu vs Navneet Rana : बच्चू कडू यांनी अमरावतीत वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत केली आहे. विशेष म्हणजे हा उमेदवार भाजपचाच असणार आहे. त्यामुळे अमरावतीत नवनीत राणा यांची अडचण होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
Amravati Lok Sabha elections 2024, Bachchu kadu vs Navneet Rana : अमरावती लोकसभा मतदार संघातून खासदार नवनीत राणा यांना महायुतीकडून उमेदवारी दिली जाणार आहे. त्यात आता शिवसेनेचे आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अमरावतीत वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत केली आहे. विशेष म्हणजे हा उमेदवार भाजपचाच असणार आहे. त्यामुळे अमरावतीत नवनीत राणा यांची अडचण होण्याची शक्यता आहे. (amravati lok sabha constituency bachchu kadu contest individule candidate against navneet rana mahayuti)
ADVERTISEMENT
बच्चू कडू यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत बच्चू कडू यांनी अमरावतीत वेगळा उमेदवार देण्याच्या तयारी केल्याची माहिती दिली. कार्यकर्त्यांची नाराजी, रोष आणि धमक्या मिळत असल्याने हा निर्णय घेतल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. इतकंच नाही तर बच्चू कडू यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप देखील केला. महायूतीच्या उमेदवाराकडून धमकी दिली जात असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी नाव न घेता नवनीत राणा यांच्यावर केला आहे. या नाराजीबाबत महायुतीच्या कोणत्याही मोठ्या नेत्याशी चर्चा न केल्याचीही त्यांनी माहिती दिली.
हे ही वाचा : NCP : अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान? जाहिरात वादात!
दरम्यान बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार का? असा प्रश्न विचारला असता, कडू म्हणाले, नाही आमच्यात मैत्रीपुर्ण लढत होईल, आमचा उमेदवार हा लाखभर मतांनी निवडून येईल. हा उमेदवार भाजप मधलाच असणार आहे. आणि येत्या 5 किंवा 6 तारखेला आम्ही अर्ज भरू.सध्या उमेदवाराने नाव सांगता येणार नाही, पण 6 तारखेलाच नक्की सांगेन, असे कडू म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
हे ही वाचा : लोकसभा निवडणुकीत 'करेक्ट कार्यक्रम'! जरांगेंचा प्लॅन तयार
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT