Lok Sabha : 'दुपार झाली, उठले असतील आणि सुपारी...', उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा!

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

uddhav thackeray criticize mns raj thackeray dadar rally anil desai mumbai lok sabha 2024
चारित्र्यहिन, गद्दार, भ्रष्टाचारी जमवून देखील त्यांना काही पुर्ण पडले नाही.
social share
google news

Uddhav Thackeray Criticize MNS Raj Thackeray : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलाय. या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) जोरदार टीका केली आहे. ''बाबा दुपार झालीय आता उठले असतील आणि सुपारी चघळत असतील, असे सुपारीबाज नको, खोकेबाज नको, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर हल्ला चढवला आहे.  (uddhav thackeray criticize mns raj thackeray dadar rally anil desai mumbai lok sabha 2024)

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीचे मुंबई दक्षिण मध्य मतदार संघाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी दादरमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेतून बोलताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला.  'हे सगळे असे चारित्र्यहिन, गद्दार, भ्रष्टाचारी जमवून देखील त्यांना काही पुर्ण पडले नाही. म्हणून कोणतरी एक नावाला पाहिजे. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यावर कोणतरी एक आडनावाचा पाहिजे, ठाकरे असे म्हणताच, उपस्थितांकडून घे सुपारी उठ दुपारी, अशी घोषणाबाजी झाली. या घोषणेचा संदर्भ घेत, 'बाबा दुपार झालीय आता उठले असतील आणि सुपारी चघळत असतील, असे सुपारीबाज नको, खोकेबाज नको, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केली. 

हे ही वाचा : मुंबईतून PM मोदींचं शरद पवारांना ओपन चॅलेंज, म्हणाले...

नरेंद्र मोदीजी तुम्हाला मी आजच निमंत्रण देतोय, आमच्या इंडिया आघाडीच्या शपथविधीला तुम्ही या,असे उद्धव ठाकरे यांनी विधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिवचलं. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज ठाकरेंच्या  6 मागण्या 

दरम्यान शुक्रवारी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या सभेत काही मागण्या मांडल्या होत्या. यामध्ये 1) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. 2) देशाच्या अभ्यासक्रमात मराठा साम्राज्याचा इतिहास शिकवला जावा.3) शिवछत्रपतींचे गडकिल्ले हीच खरी स्मारके. या गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी. 4) मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर करावा.5) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कधीही धक्का लावणार नाही, हे सांगा. आणि मूठभर मुस्लीम विरोधात, पण इतर सगळे आपल्यासोबत आहेत. मूठभर मुस्लिमांचे अड्डे तपासा, तिथे सैन्य घुसवा आणि देश कायमचा सुरक्षित करून टाका. 6) मुंबईतील लोकल रेल्वे व्यवस्थित कशी होईल, हे पहावं.

हे ही वाचा : मुंबई Tak चावडी : 'भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन देशासोबत गद्दारी...'

राज ठाकरेंच्या या सभेनंतर आता मनसेवर सुपारीबाज अशी टीका होऊ लागली आहे. या  टीकेवर आता आम्ही या पाच मागण्यांची सुपारी घेतली आहे. त्यामुळे आम्हाला सुपारी घेतल्याचा अभिमान असल्याचे उत्तर मनसेने दिले आहे.

ADVERTISEMENT

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT