Chandrakant Patil : ठाकरेंचं चंद्रकांत पाटलांकडून कौतुक, भाजप-शिवसेनेत दिलजमाई होणार?
Chandrakant patil on Udhhav Thackeray : लोकसभेत सगळ्यात जास्त मेहनत उद्धवजींनी घेतली. एक मित्र या नात्याने मनामध्ये एक भीती वाटायची, कारण आजारपण होतं. तसं असलं तरी ते खूप फिरले. त्यांना लोकसभेत 9 जागा, काँग्रेसला 18 आणि राष्ट्रवादीला 9 जागा मिळाल्या, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
Chandrakant Patil on Udhhav Thackeray : ''उद्धव ठाकरे यांना आजारपण असताना देखील ते खूप फिरले. त्यांना 9 जागा मिळाल्या. लोकसभेत त्यांनी खूप मेहनत घेतली, असे कौतुक भाजप नेते चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. तसेच मी काय सल्ला देणारा माणूस नाही पण उद्धवजींनी (Udhhav Thackeray) आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण काय मिळवलं? आपल्या हाताशी काय लागलं? असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या या सल्ल्यानंतर भाजप-शिवसेनेत पुन्हा दिलजमाई होते का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (chandrakant patil on udhhav thackeray lok sabha elction result 2024 shiv sena ubt seat maha vikas aghahi bjp shiv sena alliance)
ADVERTISEMENT
चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात भाजप शिवसेनेची युती असताना उद्धव ठाकरेंनी 23 जागा लढवल्या होत्या. त्यातल्या 18 जागा त्यांनी जिंकल्या होत्या. आणि आता या निवडणुकीत त्यांनी 9 जागा जिंकल्या. उद्धव ठाकरे 2019 ला एकत्र राहिले असते तर अशी वाताहत झाली नसती, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा : ठाकरेंनी पटोलेंचा फोन टाळला? महाविकास आघाडीत काय घडतंय?
चंद्रकात पाटील पुढे म्हणाले की, लोकसभेत सगळ्यात जास्त मेहनत उद्धवजींनी घेतली. एक मित्र या नात्याने मनामध्ये एक भीती वाटायची, कारण आजारपण होतं. तसं असलं तरी ते खूप फिरले. त्यांना लोकसभेत 9 जागा, काँग्रेसला 18 आणि राष्ट्रवादीला 9 जागा मिळाल्या.
हे वाचलं का?
उद्धवजींनी याच आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी काय त्यांना सल्ला देणारा माणूस नाही, पण त्यांनी आत्मपरिक्षण करावे,आपण काय मिळवलं? आपल्या हाताशी काय लागलं? याउलट त्यांच्यावर एकप्रकारे अल्पसंख्यांकांच्या मतावर निवडून आल्याचा ठपका बसला. जर 2019 ला एकत्र राहिले असते तर ही वाताहत झाली नसती. यात काँग्रेस, राष्ट्रवादीने आपला फायदा पक्का करून घेतल्याचेही चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे.
हे ही वाचा : Modi 3.O: नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचं नुकसान, नेमकं कसं?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT