Raj Thackeray: 'मी पहाटे 5 वाजताच उठतो..', राज ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर; सगळा दिनक्रमच सांगितला!

मुंबई तक

ADVERTISEMENT

राज ठाकरेंनी सगळा दिनक्रमच सांगितला!
राज ठाकरेंनी सगळा दिनक्रमच सांगितला!
social share
google news

Raj Thackeray Statement on Sleep: मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांचं राजकारण गांभीर्याने करत नाहीत, ते सकाळी उशिरा उठतात.. अशा टीका त्यांच्या विरोधकांकडून अनेकदा केल्या जातात. जाहीर सभांमधून देखील काही नेते राज ठाकरेंना यावरून टोमणेही मारतात. मात्र, आता याबाबत राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. (i wake up at 5 am mns chief raj thackeray told his whole routine reply to the opponents)

ADVERTISEMENT

मी पहाटे 5 वाजताच उठतो, मला साधारण तेव्हा जाग येतेच.. त्यानंतर मी टेनिस खेळायला जातो आणि नंतर माझी इतर काम सुरू होतात. असं म्हणत राज ठाकरेंनी आता झोपेच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर राजकीय टीका करणाऱ्यांना त्यांच्या विरोधकांना एक प्रकारे उत्तर दिलं आहे. बोल भिडू या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी झोपेबाबत भाष्य केलंय.

हे ही वाचा>> 'एवढ्या जागा जिंकणार', पवारांनी सांगितलेला आकडा ठरणार खरा?

'मी पहाटे 5 वाजताच उठतो..', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले...  

प्रश्न: मुलाखत घ्यायची तेव्हा तुम्ही असं म्हटलं की, सकाळी 8 वाजता भेटू म्हणालात.. मला वाटलं तुम्ही त्रास देताय.. एवढी तुमच्याबाबत बाहेर चर्चा असते... 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज ठाकरे: मला असं वाटतं गैरसमज असलेले बरे.. माझी जर दिनचर्या ऐकायची असेल तर.. मी साधारणपणे 5 वाजता उठतो, आता टेनिस बंद झालं म्हणून नाही तर मी सकाळी 6 वाजता टेनिस खेळायला जायचो. लवकरच जाईन मी खेळायला.. 

साधारण 8-8.30 ला ओपीडी सुरू होते माझी.. लोकं येतात ना माझ्याकडे भेटायला.. 

मला येतेच पहाटे 5 वाजता जाग.. असं नव्हतं की, मी उशिरा उठत नव्हतो की काय... पूर्वीच्या काळात कॉलेजमध्ये असताना किंवा त्यानंतरही म्हणा..

ADVERTISEMENT

पण मला झोप पूर्ण झालेली पाहिजे निश्चितपणे.. अनेकांना माझा सल्लाच आहे तुमची चांगली झोप झालीच पाहिजे. किमान 8 तास झोप घेतलीच पाहिजे. नाहीतर आजारी पडेल माणूस. 

नाहीतर श्रीकृष्ण म्हणाले होते तसं.. ग्लानिर्भवति भारत.. ती ग्लानी घेऊन दिवसभर फिरायचं त्यापेक्षा झोप झालेली बरी..

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'उद्धव ठाकरेंची औकात काय? रुग्ण आहेस रुग्णच राहा'

तुम्हाला माहितीए का.. अमेरिकेत स्लिपिंग असोसिएशन आहेत.. त्यातील एका स्लिपिंग असोसिएशनचा अध्यक्ष अल्पाचिनो आहे. ते प्रचार करतात माणसानं जास्तीत जास्त झोपलं पाहिजे. किंवा विस्टन चर्चिल.. युद्धकाळात 4 ते 8 असे झोपायचे.. 

असं उत्तर राज ठाकरेंनी यावेळी दिलं आहे. आतापर्यंत अनेकदा राज ठाकरेंवर या मुद्द्यावरून टीका झाली आहे. मात्र, त्याकडे आपण दुर्लक्ष करत असल्याचं राज ठाकरेंनी अनेकदा सांगितलं होतं. मात्र, आता त्यांनी याबाबत पहिल्यांदा त्यांची नेमकी काय बाजू आहे हे सांगितलं आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT