Rashtrapati Bhavan Leopard : राष्ट्रपती भवनात फिरणारा 'तो' प्राणी कोणता? अखेर उत्तर मिळालं

मुंबई तक

ADVERTISEMENT

राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्यावेळी एक प्राणी दिसला होता.
राष्ट्रपती भवनात दिसलेला प्राणी बिबट्या नाही, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राष्ट्रपती भवनामध्ये खरंच बिबट्या शिरला होता का?

point

राष्ट्रपती भवनामध्ये दिसलेला प्राणी कोणता?

Leopard in Rashtrapati Bhavan : राष्ट्रपती भवनामध्ये रविवारी (९ जून) एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तो प्राणी बिबट असल्याचे लोक म्हणताहेत. पण, याबद्दल आता दिल्ली पोलिसांनीच खुलासा केला आहे. (Delhi Police said that the animal captured on camera during a live telecast of the oath-taking ceremony of PM and his ministers is a common house cat.) 

नरेंद्र मोदी यांनी ९ जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी तब्बल ७१ मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. भाजपचे मंत्री दुर्गा दास यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यानंतर स्वाक्षरी करत असताना कॅमेऱ्यात एक प्राणी त्यांच्या पाठिमागे फिरताना कॅमेऱ्यात कैद झाला.

हेही वाचा >> देशाचे नवे कृषी आणि आरोग्य मंत्री कोण? सगळी यादी जशीच्या तशी 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर हा तुफान व्हायरल झाला. यावरून उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. राष्ट्रपती भवनात दिसलेला तो प्राणी कोणता? असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जाऊ लागले. अनेकांनी तो बिबट्या असल्याचे म्हटले. अखेर यावर अधिकृतपणे उत्तर देण्यात आले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> महाराष्ट्रातील मंत्र्यांना मिळाली 'ही' खाती, शिवसेनेला कोणते खाते? 

दिल्ली पोलिसांनी सांगितलं 'तो' प्राणी कोणता?

राष्ट्रपती भवनामध्ये फिरणारा तो प्राणी बिबट्या असल्याची चर्चा दिल्ली पोलिसांनी फेटाळून लावली आहे. दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, काही मीडिया चॅनल आणि सोशल मीडियावर रविवारी राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित शपथ ग्रहण समारंभात लाईव्ह प्रसारणावेळी एका प्राण्याचे चित्र दाखवत आहेत. हा जंगली प्राणी असल्याचा दावा केला जात आहे. हे खरं नाही. कॅमेऱ्यात कैद झालेला प्राणी हा घरात असणारी मांजर आहे. कृपया या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT