Maharashtra Opinion Poll: पवार वि. फडणवीस.. लोकसभेला पश्चिम महाराष्ट्रात किंग कोण? सर्व्हेत कोणाला किती जागा...
Western Maharashtra Opinion Poll: एबीपी सी-व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत असणार आहे. पण विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती असणार हे आपण जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
Lok Sabha Election 2024 Opinion Poll: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या पार्श्वभूमीवर एबीपी सी-व्होटरने केलेल्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात भाजप आणि एनडीएला बऱ्यापैकी यश मिळत आहे. सर्व्हेनुसार, महायुतीला 30 तर महाविकास आघाडीला 18 जागा आगामी निवडणुकीत मिळू शकतात. मात्र, यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील जनतेचा नेमका कौल कुणाचा बाजूने असणार हेच आपण सविस्तर पणे पाहूया..
ADVERTISEMENT
सर्व्हेनुसार पश्चिम महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात?
- भाजप - 3 जागा
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 5 जागा
- शिवसेना (शिंदे गट) - 2 जागा
- शिवसेना (ठाकरे गट) - 1 जागा
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 0 जागा
- काँग्रेस - 0 जागा
या सर्व्हेचा विचार केल्यास पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरही शरद पवार यांच्याच पाठिशी असल्याचं मिळतंय. कारण पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघात शरद पवारांची राष्ट्रवादी विजय मिळवू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला एक जागा मिळू शकते. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इथं खातंही उघडता येणार नसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. म्हणजेच महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्टात एकूण 6 जागा मिळू शकतात.
हे ही वाचा>> महाराष्ट्र: 48 मतदारसंघामध्ये कोण जिंकणार? संपूर्ण यादी
दुसरीकडे महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात एकूण 5 जागा मिळू शकतात. ज्यापैकी भाजपला 3 जागा मिळतील तर शिवसेना शिंदे गट यांना 2 जागा मिळू शकतात. असं सर्व्हेत म्हटलंय.
हे वाचलं का?
पश्चिम महाराष्ट्र हा आजवर कायमच शरद पवारांच्या पाठिशी राहिलेला दिसून आला आहे. येथील सहकार क्षेत्राच्या साहाय्याने पवारांनी यशस्वी राजकारण केलं आहे. पण राज्यात फडणवीसांचा राजकीय उदय झाल्यापासून ते सातत्याने पवारांना शह देण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढावी यासाठी ते प्रयत्नशील असतात. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत भाजपला पश्चिम महाराष्ट्रात अपेक्षित असं यशही मिळालं. मात्र यंदा पश्चिम महाराष्ट्रातील मतदार हे कोणाला पसंती देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सातारा, माढा, बारामती, शिरूर आणि अहमदनगर या मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची स्थिती चांगलं असल्याचं सर्व्हेत म्हटलं आहे. तर पुणे, सोलापूर आणि सांगलीमध्ये भाजप पुन्हा विजय मिळविण्याची शक्यता आहे. पण शेवटच्या क्षणी नेमकं कोण बाजी मारणार यावर नेमकं गणित ठरणार आहे.
ADVERTISEMENT
Opinion Poll: प. महाराष्ट्रातील मतदारसंघानुसार कोणता उमेदवार जिंकणार, पाहा सर्व्हेत नेमकं काय म्हटलंय..
1. पुणे (सोपा विजय)
मुरलीधर मोहोळ - भाजप - आघाडीवर
रवींद्र धंगेकर - काँग्रेस - पिछाडीवर
वसंत मोरे - वंचित - पिछाडीवर
ADVERTISEMENT
2. बारामती (चुरशीची लढत)
सुप्रिया सुळे - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - आघाडीवर
सुनेत्रा पवार - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - पिछाडीवर
3. शिरूर (सोपा विजय)
अमोल कोल्हे - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - आघाडीवर
शिवाजीराव आढळराव - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - पिछाडीवर
4. मावळ (सोपा विजय)
श्रीरंग बारणे -शिवसेना (शिंदे गट) - आघाडीवर
संजोग वाघेरे - शिवसेना (ठाकरे गट) - पिछाडीवर
5. सोलापूर (चुरशीची लढत)
राम सातपुते - भाजप - आघाडीवर
प्रणिती शिंदे - काँग्रेस - पिछाडीवर
6. माढा (सोपा विजय)
रणजीतसिंह निंबाळकर - भाजप - पिछाडीवर
धैर्यशील मोहिते-पाटील - राष्ट्रवादी (शरद पवार) - आघाडीवर
हे ही वाचा>> Opinion Poll 2024 : अजित पवारांना मोठा झटका! NCP ला पोलमध्ये किती जागा?
7. सांगली (चुरशीची लढत)
संजयकाका पाटील - भाजप - आघाडीवर
चंद्रहार पाटील - शिवेसना (ठाकरे गट) - पिछाडीवर
विशाल पाटील - अपक्ष - पिछाडीवर
8. सातारा (चुरशीची लढत)
उदयनराजे भोसले - भाजप - पिछाडीवर
शशिकांत शिंदे - राष्ट्रवादी (शरद पवार) - आघाडीवर
9. कोल्हापूर (चुरशीची लढत)
संजय मंडलिक - शिवसेना (शिंदे गट) - आघाडीवर
शाहू महाराज छत्रपती - काँग्रेस - पिछाडीवर
10. हातकणंगले (चुरशीची लढत)
धैर्यशील माने - शिवसेना (शिंदे गट) - पिछाडीवर
सत्यजीत पाटील शिवसेना (ठाकरे गट) - आघाडीवर
राजू शेट्टी - स्वाभिमानी - पिछाडीवर
11. अहमदनगर (चुरशीची लढत)
सुजय विखे-पाटील - भाजप - पिछाडीवर
निलेश लंके - राष्ट्रवादी (शरद पवार) - आघाडीवर
सर्व्हेनुसार प. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काँटे की टक्कर असल्याचं दिसून येतं आहे. पण असं असलं तरी जनता ऐन मतदानाच्या दिवशी नेमकं कुणाला मतदान करणार हे सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतरच सगळं चित्र हे स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT