PM Modi: 'ईडी एकदम..', PM मोदी ED-CBI वर नेमकं म्हणाले काय?
PM Modi Interview ED CBI: लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखत दिली आहे. ही मुलाखत एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
PM Modi Interview: नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) ANI या वृत्तसंस्थेला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. याच मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी ईडी आणि सीबीआयवर देखील भाष्य केलं आहे. (lok sabha election 2024 pm modi no one needs to be afraid modi said ed is doing excellent work we dont play like opposition)
ADVERTISEMENT
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी म्हणाले की, 'त्यांच्याकडे मोठ्या योजना आहेत. पण कोणालाही घाबरण्याची गरज नाही. माझे निर्णय कोणालाही घाबरवण्यासाठी किंवा कुणाला कमी लेखण्यासाठी नाहीत. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी ते बनविण्यात आले आहेत.'
ईडी, सीबीआय, निवडणूक आयोगावर काय म्हणाले मोदी?
जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'लेव्हल प्लेइंग फील्ड'चा अभाव आणि ईडी, सीबीआय, ईसी इत्यादी एजन्सींवर कथित प्रभावाबद्दल विचारण्यात आले.
हे वाचलं का?
यापैकी एकही कायदा (ईडी, सीबीआय खटले दाखल करणे) माझ्या सरकारने आणलेला नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. उलट भाजप सरकारने निवडणूक आयोग बदलण्यासाठी कायदा आणला. याआधी कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तींनाच निवडणूक आयुक्त बनवले जायचे आणि नंतर त्यांना राज्यसभा किंवा इतर मंत्रालयांवर पाठवले जायचे. पंतप्रधानांनी उपरोधिकपणे सांगितले की, पण आम्ही (भाजप) त्या पातळीचे काम करू शकत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगासमोरील अटींबाबत काँग्रेसवर ताशेरे ओढले आहेत. ईडी आज उत्कृष्ट काम करत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. त्यांनी दावा केला की, ईडीची 97 टक्के प्रकरणे राजकारणात सहभागी नसलेल्या लोकांविरुद्ध आहेत.
ADVERTISEMENT
पीएम मोदी पुढे म्हणाले की, "प्रामाणिक माणसाला कोणाची भीती बाळगण्याची गरज नसते. पण भ्रष्टाचाराने घेरलेल्यांना पापांची भीती असते." पीएम पुढे म्हणाले, "आज किती विरोधी नेते तुरुंगात आहेत? मला कोणी सांगत नाही. आणि हेच विरोधी नेते आहेत का जे सरकार चालवत असत? हीच पापांची भीती आहे. शेवटी, प्रामाणिक माणसाला घाबरण्याची गरज नसते.'
ADVERTISEMENT
'मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्यांनी माझ्या गृहमंत्र्याला तुरुंगात टाकले होते, हे देशाने समजून घेतले पाहिजे की, केवळ तीन टक्के प्रकरणे राजकारणाशी संबंधित असलेल्या लोकांवर आहेत. तर 97 टक्के प्रकरणं ही राजकारणात सहभागी नसलेल्या लोकांविरुद्ध आहेत.
कोणालाही घाबरण्याची गरज नाही - पंतप्रधान मोदी
विरोधकांच्या आरोपांबाबत पंतप्रधान मोदींना विचारले असता ते म्हणाले की, पराभवासाठी विरोधकांना काही तरी निमित्त हवे आहे. पराभवासाठी ते थेट स्वत:ला दोष देऊ शकत नाहीत. त्यामुळे ईव्हीएम आणि एजन्सीला दोष दिला जातो.'
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT