Lok Sabha Election 2024: मविआमध्ये शिवसेनाच (UBT) मोठा भाऊ, पण महायुतीत शिंदे...

रोहित गोळे

ADVERTISEMENT

मविआमध्ये शिवसेना मोठा भाऊ
मविआमध्ये शिवसेना मोठा भाऊ
social share
google news

Shiv Sena UBT total seats: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 साठी शिवसेनेने (ठाकरे गट) पहिल्या यादीत आपले 17 उमेदवार जाहीर केले आहेत. ज्याची घोषणा आज (27 मार्च) करण्यात आली. महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला ठरला आहे त्यानुसार, ठाकरे गटाला तब्बल 22 जागा मिळाल्या आहेत. ज्यापैकी 17 जागांवर त्यांनी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचीच सरशी झाली आहे. (lok sabha election 2024 shiv sena ubt is big brother in mahavikas aaghadi but in grand alliance mahayuti shinde shivsena will have to fight less seats than bjp)

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंची शिवसेना लढवणार सर्वाधिक जागा...

2019 साली सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने 56 जागा निवडून आलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्री पद देत महाविकास आघाडीत थोरलेपण दिलं होतं. तसंच थोरलेपण हे आता जागा वाटपात देखील देण्यात आलं आहे.

हे ही वाचा>> Yavatmal washim : ठाकरेंनी जुना शिवसैनिक उतरवला मैदानात, कोण आहेत संजय देशमुख?

2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 20 हून अधिक जागा लढवल्या होत्या. आता देखील ठाकरे पुन्हा एकदा 20 हून अधिक जागा लढवणार असल्याचं समजतं आहे. अशावेळी महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचं आता बोललं जात आहे. 

हे वाचलं का?

महायुतीत शिवसेना नाही तर भाजप मोठा भाऊ?

दुसरीकडे महायुतीत मात्र, भाजप जागावाटपात सर्वांपेक्षा वरचढ असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत भाजपने 23 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. याशिवाय येत्या दोन-तीन दिवसात ते आणखी काही उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप 30 जागा लढविण्याची शक्यता आहे. 

तर बंड करून भाजपसोबत आलेल्या शिंदेंना मात्र, भाजपपेक्षा कमी जागा मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आतापर्यंत शिंदेंकडून फक्त एकाच जागेवरील उमेदवाराची घोषणा झाली आहे. ती म्हणजे राजू पारवे. ज्यांनी आज (27 मार्च) शिवसेनेचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Lok Sabha Elections 2024 : 'खिचडी चोर'; ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात काँग्रेस नेत्याचे बंड

पण शिंदेंच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीनही पक्षांची उद्या (28 मार्च) एक जाहीर सभा घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये सर्व जागांवरील उमेदवार हे जाहीर केले जातील.  त्यानंतर महायुतीतील नेमकं चित्र हे स्पष्ट होणार आहे.

ADVERTISEMENT

पण, असं असलं तरी लोकसभा निवडणुकीत महायुतीत जागांच्या बाबतीत भाजपच महत्त्वाची भूमिका बजावणार असून शिंदे गट आणि अजित पवार गट यांना दुय्यम भूमिका बजवावी लागणार आहे.

अशावेळी आता शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्ते हे कशा पद्धतीने हे संपूर्ण राजकारण स्वीकारतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT