Opinion Poll: भाजपला मिळणार 'एवढ्या' जागा, पण MVA साठी धोक्याची घंटा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Opinion Poll नुसार महाराष्ट्रात कोण मारणार बाजी?
Opinion Poll नुसार महाराष्ट्रात कोण मारणार बाजी?
social share
google news

Lok Sabha Elections 2024 Opinion Poll Survey: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदानाचा पहिला टप्पा हा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याच आधी एबीपी सी व्होटरने ओपिनियन पोलच्या माध्यमातून जनतेचा कौल जाणून घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नेमकी काय स्थिती असणार याबाबतचा अंदाज आता वर्तविण्यात आला आहे. (lok sabha elections 2024 nda will get 30 seats but the india alliance can win 18 seats according to the abp c voter opinion poll)

एबीपी सी-व्होटर पोलनुसार महाराष्ट्रात एनडीएला चांगलं यश मिळू शकतं. पण दुसरीकडे महाविकास आघाडी देखील चांगली टक्कर देईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ओपिनियन पोल: महाराष्ट्रात NDA आणि MVA ला किती जागा?

महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी NDA ला एकूण 30 जागा मिळतील असा अंदाज एबीपी-सी व्होटरच्या ओपिनियन पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला एकूण 18 जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या सर्व्हेनुसार, महाराष्ट्रात भाजप आणि एनडीएची स्थिती काहीशी सुधारलेली दिसते आहे. मात्र, असं असलं तरीही मागील दोन निवडणुकांमध्ये म्हणजे 2014 आणि 2019 मध्ये एनडीएनने 40 हून अधिक जागांवर विजय मिळवला होता. तो आकडा एनडीएला या निवडणुकीत गाठता येत नसल्याचं सर्व्हेमध्ये दिसतं आहे.

ओपिनियन पोल: कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात?

भाजप: ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात मागील दोन्ही निवडणुकांप्रमाणेच जागा मिळतील असा अंदाज आहे. म्हणजेच भाजपला 21 किंवा 22 जागा मिळू शकतात. असं सर्व्हेत म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

शिवसेना (शिंदे गट): शिवसेना शिंदे गटाला महाराष्ट्रात 9 किंवा 10 जागा मिळू शकतात असा अंदाज सर्व्हेत वर्तविण्यात आला आहे. 

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार): महायुतीत सर्वाधिक फटका कुणाला बसेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला असं दिसत आहे. कारण सर्व्हेनुसार, अजित पवारांच्या पक्षाला एकही जागेवर विजय मिळणार नाही असा अंदाज सर्व्हेत वर्तवला आहे.

शिवसेना (ठाकरे गट): महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे गट) यांना सर्वाधिक 9 जागा मिळतील असा दावा सर्व्हेत करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार): सर्व्हेनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना 5 जागांवर विजय मिळू शकतो. असं सर्व्हेत म्हटलं आहे. अशी कामगिरी केल्यास शरद पवार गटासाठी ती नक्कीच चांगली ठरू शकते.

काँग्रेस: ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रात काँग्रेसची परिस्थिती फार काही चांगली नाही. कारण त्यांना राज्यात केवळ तीनच जागा मिळतील असा अंदाज सर्व्हेत वर्तविण्यात आला आहे.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT