Manoj Jarange : "विधानसभेला 288 जागांवर उमेदवार पाडणार", जरांगेंचा महायुतीविरोधात एल्गार

मुंबई तक

ADVERTISEMENT

manoj jarange patil big statement on vidhan sabha election 2024 288 candidate ultimates mahayuti government
आजच्या तारखेपासून 1 महिन्यात जर आरक्षण दिलं नाही तर मी कोणाचच ऐकणार नाही.
social share
google news

Manoj Jarange Patil Protest : गौरव साळी, जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच विधानसभेच्या (Vidhan Sabha Election 2024) 288 जागांवर उमेदवार पाडणार असल्याचा इशारा देखील त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना दिला आहे. या इशाऱ्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांची धाकधुक चांगलीच वाढली आहे.( manoj jarange patil big statement on vidhan sabha election 2024 288 candidate ultimates mahayuti government)

ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आज सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं. राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई, भाजपचे आमदार राणाजगजित सिंह पाटील आणि छत्रपती संभाजी नगरचे नवनिर्वाचित खासदार संदिपान भूमरे या शिष्टमंडळात होते. या शिष्टमंडळाने जरांगे पाटलांनी यशस्वी मनधरणी केली आहे. त्यानंतर जरांगे पाटलांनी पाणी पिऊन उपोषणाला स्थगिती दिली. 

हे ही वाचा : 'शाहांना सांगितलेलं शिवसेना पक्ष चिन्ह काढू नका...', राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

मनोज जरांगेंच्या मागण्या काय? 

1) आम्ही दिलेली सगे सोयरेची व्याख्या असायला पाहिजे. सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा. 
2) आता 57/ 63 लाख नोंदींचा आधार मिळाला आहे.
3) हैदराबादचे गॅझेटचा आधार घ्यायला सांगितला आहे. 
4) अंतरावली सराटीसह राज्यातील गुन्हे मागे घ्यावेत. 
5) शिंदे समितीने रद्द न करता, 24 तास सुरू ठेवावीत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या मागण्या मांडत जरांगे म्हणाले की, आम्ही तुम्हाला पाच महिने वेळ दिलेला आहे. त्यातले 2 महिने आचारसंहितेत गेले. आता आम्ही तुम्हाला 30 जून पर्यंत वेळ देतो, असे जरांगेंनी म्हटले पण शंभू राजे देसाई यांनी 1 महिन्याचा अवधी मांगितला. जरांगेंनी यावर जर तुम्ही 1 महिन्यात आरक्षण दिलं नाही तर आम्ही निवडणुकीत उतरणार आणि 288 विधानसभेत सगळ्या सीट पाडणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला. 

हे ही वाचा : Raj Thackeray : राज ठाकरेंनी वाढवली भाजपची 'कटकट'! स्वबळावर लढणार 'एवढ्या' जागा

आजच्या तारखेपासून 1 महिन्यात जर आरक्षण दिलं नाही तर मी कोणाचच ऐकणार नाही. मी निवडणुकीची चळवळ सुरूच ठेवणार. 13 जुलै पर्यंत सरकारला वेळ दिला. 14 जुलैला मी कोणाचंच ऐकणार नाही, असा इशाराच जरांगेनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT