Narendra Modi : 'काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान', PM मोदींचा हल्लाबोल

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

narendra modi criticize congress on mumbai terrorist attack vijay waddetiwar ujjwal nikam india alliance
काँग्रेस दहशतवादी हल्ल्यात काँग्रेसला क्लीनचीट देतेये.
social share
google news

Narendra Modi Criticize Congress : 'काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला निर्दोष ठरवलं. हा मुंबईच्या दहशतवादी हल्यात मारल्या गेलेल्या सगळ्या निष्पाप नागरीकांचा अपमान आहे. हा सुरक्षा दलाचा अपमान आहे. तुकाराम ओंबळेंसारख्या शहिदांचा हा अपमान आहे, असा हल्लाबोल नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) काँग्रेसवर (Congress) केला आहे.   (narendra modi criticize congress on mumbai terrorist attack vijay waddetiwar ujjwal nikam india alliance) 

नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी मोदींनी इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. 'तिसऱ्या टप्प्यातील मतदानाने हे स्पष्ट केले आहे की, 4 जूनला इंडी आघाडीची एक्सपायरी डेट ठरली आहे. 4 जून नंतर इंडी आघाडीचा झेंडा उचलणाराही कोणी सापडणार नाही', असा टोला मोदींनी लगावला आहे.  

हे ही वाचा : अजितदादांच्या आमदाराची तुफान शिवीगाळ, बारामतीत राडाच-राडा!

'काँग्रेसची सीमेपलिकडची बी टीम अ‍ॅक्टीव्ह झाली आहे. या बदल्यात काँग्रेस दहशतवादी हल्ल्यात काँग्रेसला क्लीनचीट देतेये. काँग्रेस पार्टी दहशतवाद्यांना निरपराध असल्याचा सर्टीफिकेट देतेय',असा हल्ला मोदींनी काँग्रेसवर चढवला. . 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, 'हे काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला निर्दोष ठरवलं.हे मुंबई हल्यात मारलेल्या गेलेल्या सगळ्या निर्दोष नागरीकांचा अपमान आहे. हा सुरक्षा दलाचा हा अपमान आहे. तुकाराम ओंबळेंसारख्या शहिदांचा हा अपमान आहे', अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली. 

हे ही वाचा : मतदान सुरू असतानाच सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी, नवा डाव काय?

'महाराष्ट्रात काँग्रेसने शेतकऱ्यांना संकटात टाकलं, दुष्काळाच संकट वाढत गेली, पण काँग्रेस आपल्या लुटीत व्यस्त होती. निळवंडे डॅमच काम 1970 मध्ये सुरू झाले होते. त्यावेळी डॅमचा खर्च 8 करोड होता. आज तो वाढून 5 हजार करोड झाला आहे. हे पाप काँग्रेसने केले आहे. डॅमच्या नावावर काँग्रेस नेत्यांची खिसे भरत राहिली. आणि शेतकऱ्याची शेती कोरडीच राहिली. या कामाला 2017 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी गती दिली. लेफ्ट कॅनॉलचा काम पूर्ण झाले आहे. लवकरच ही य़ोजना सुरु होईल, असे मोदी म्हणाले आहेत. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT