Lok Sabha Election 2024 : ''उद्धव सारखं मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी मोदींना...'', राज ठाकरे कडाडले!
Raj Thackeray criticize Udhhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करत आहेत.तशी माझी टीका नव्हती. मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी विरोध केला नाही. मला भूमिका पटली नाही, म्हणून मी विरोध केला'', असा चिमटा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना काढला.
ADVERTISEMENT
Raj Thackeray criticize Udhhav Thackeray : ''मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी विरोध केला नाही. तुमचा पक्ष फोडला, तुम्हाला सत्तेतून हाकललं म्हणून तुम्ही स्वार्थासाठी विरोध केलात'', असा हल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चढवला आहे. तसेच जेव्हा मी विरोध करत होतो. तेव्हा खिशातले राजीनामे बाहेर काढून माझ्यासोबत का आला नाहीत, असा सवाल देखील राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. (raj thackeray criticize udhhav thackeray sanjay raut support narendra modi for lok sabha election 2024 gudhi padwa melava dadar shivaji park)
राज ठाकरे शिवाजी पार्कवरील गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आ''ज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करत आहेत.तशी माझी टीका नव्हती. मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी विरोध केला नाही. मला भूमिका पटली नाही, म्हणून मी विरोध केला'', असा चिमटा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना काढला. ''तुम्ही आज जे विरोधात बोलताय. मग मी जेव्हा बोलत होतो. तेव्हा खिशातले राजीनामे बाहेर काढून माझ्यासोबत का नाही आलात. त्यावेळी सत्तेत मलिदा चाटत होतात ना'', असा टोला देखील राज ठाकरेंनी ठाकरे गटाला लगावला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Lok Sabha Election 2024 : नवनीत राणांसमोर आव्हान वाढलं? आंबेडकरांना 'या' पक्षाने दिला पाठिंबा
आज यांना गोष्टी सुचतायत. याच कारण तुमचा पक्ष फुटला म्हणून, तुम्हाला सत्तेतून हाकललं म्हणून, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही या गोष्टी केल्यात. मी त्या गोष्टी नाही केल्यात, मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोध केला. मला त्या बदल्यात काय हवं होतं म्हणून मी भूमिका नाही घेतली, अशी टीका देखील राज ठाकरेंनी ठाकरे गटावर केली.
राज ठाकरेंचा भाजपला बिनशर्त पाठिंबा
दरम्यान यावेळी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. ''मला त्या राज्यसभा नको आणि त्या विधानसभाही नको. पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीला फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, असे राज ठाकरेंनी जाहीर केले. तसेच ज्याच्याकडुन माझी अपेक्षा आहे. त्याही पुर्ण झाल्या नाहीत, तर राज ठाकरेंचं तोंड आहेत, असा सुचक इशाराही त्यांनी दिला. आणि कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याच्याही सूचना दिल्या.
हे वाचलं का?
हे ही वाचा : महायुतीच्या 20 ते 17 जागा 'डेंजर झोन'मध्ये, 'मविआ' मारणार मुसंडी!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT