Mumbai North Lok Sabha 2024 : मुंबई उत्तर लोकसभेची जागा ठाकरे लढणार, उमेदवारही ठरला! मुंबई Tak चावडीवर राऊतांचे संकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

sanjay raut mumbai tak mumbai north lok sabha constituency piyush goyal maharashtra politics maha vikas aghadi seat sharing
महायुतीतून मुंबई उत्तर लोकसभेची जागा भाजप लढणार आहे.
social share
google news

Sanjay Raut Mumabi Tak Chavadi : लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीतून 22 जागा लढणार आहे. यापैकी 21 जागेवर ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आहे. तर उरलेल्या एका जागेची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे.  ही जागा मुंबई उत्तर लोकसभा असण्याची शक्यता आहे. कारण मुंबई तकच्या चावडीवर ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी ती  (मुंबई उत्तर) जागा आम्ही लढू आणि जिंकुन दाखवू, राजकारणात काही कठीण नसतं, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे ही जागा ठाकरे लढणार असल्याचा अंदाज आहे. (sanjay raut mumbai tak mumbai north lok sabha constituency piyush goyal maharashtra politics maha vikas aghadi seat sharing) 

ADVERTISEMENT

महायुतीतून मुंबई उत्तर लोकसभेची जागा भाजप लढणार आहे. या जागेवरून भाजपने पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. तसेच या जागेवर आतापर्यंत भापजचेच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे या जागेवर भाजपला हरवणे, म्हणजे महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान आहे. ''पण ती जागा आम्ही लढू ना. जिंकून दाखवू, राजकारणात काही कठीण नसतं. जिद्द पाहिजे. आमच्यात ती जिद्द आहे, कठिण जागा लढण्याची'', असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

हे ही वाचा : महाराष्ट्रात BJPला प्रचंड मोठा धक्का, मविआला मिळणार यश?

ठाकरेंचा उमेदवार कोण असणार? 

मुंबई उत्तर लोकसभेतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी फेसबूक लाईव्ह चालू असताना शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेत घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती. 

हे वाचलं का?

दरम्यान उत्तर मुंबई हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना तिकीट दिल्यास त्यांना मतदाराची सहानुभूती मिळू शकते. तसे झाल्यास तेजस्वी घोसाळकर यांचा विजय सुकर होऊ शकतो. हाच विचार उद्धव ठाकरे यांनी केला असावा. 

हे ही वाचा : शरद पवारांचा PM मोदींना टोला! ''माझं बोट धरून राजकारणात आले, आता बोटाची काळजी...''

दरम्यान अद्याप ठाकरेंकडून याबाबतची घोषणा करण्यात आली नाही आहे. मात्र उद्या महाविकास आघाडी त्यांची संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषेदत ते या जागेवर दावा सांगून घोसाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT