Shiv Sena Candidate list : शिंदेंचे लोकसभेचे 15 उमेदवार ठरले! पहा संपूर्ण यादी

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांच्या नावांची संपूर्ण यादी.
मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र

point

महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला १५ जागा

point

युती लढवलेल्या आठ जागा गेल्या मित्रपक्षांकडे

Shiv Sena Candidates For Lok Sabha election : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा मिळणार, या लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्या आधीपासून सुरु असलेल्या प्रश्नाला अखेर उत्तर मिळालं. महाराष्ट्रातील ४८ जागांचे वाटप महायुतीत अंतिम झाले आहे. ज्या जागावरून पेच निर्माण झाला होता आणि त्या शिंदेंकडेच राहणार की भाजपकडे जाणार हेही आता स्पष्ट झाले आहे. (Full List of Shiv Sena Lok Sabha Candidates)

ADVERTISEMENT

शिवसेना लोकसभा उमेदवारांची यादी

1) कोल्हापूर -संजय मंडलिक
2) रामटेक - राजू पारवे
3) बुलढाणा- प्रतापराव जाधव
4) यवतमाळ-वाशिम - राजश्री पाटील
5) मावळ -श्रीरंग बारणे
6) हिंगोली - बाबूराव कदम
7) औरंगाबाद - संदीपान भुमरे
8) शिर्डी - सदाशिव लोखंडे
9) नाशिक - हेमंत गोडसे
10) ठाणे - नरेश म्हस्के
11) दक्षिण मुंबई - यामिनी जाधव
12) उत्तर पश्चिम मुंबई - रवींद्र वायकर
13) दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे
14) हातकणंगले - धैर्यशील माने
15) कल्याण - श्रीकांत शिंदे

या मतदारसंघात बदलले उमेदवार

एकनाथ शिंदे यांनी काही लोकसभा मतदारसंघामध्ये विद्ममान खासदारांविरोधात वातावरण असल्याने उमेदवार बदलले. यात महत्त्वाचे म्हणजे एका मतदारसंघात उमेदवारी मागे घेऊन दुसरा उमेदवार देण्यात आला, ज्याची बरीच चर्चा झाली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजपने महाराष्ट्रातील 'या' 7 खासदारांची कापली तिकिटं

रामटेक लोकसभा मतदारसंघात विद्ममान खासदार कृपाल तुमाने यांच्याऐवजी काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली. हिंगोली लोकसभा मतदारसंघात आधी हेमंत पाटील यांना तिकीट दिले गेले, पण नंतर बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली.

हेही वाचा >> महाराष्ट्रात महायुतीच्या जागा घटणार? मोदींनी दिले उत्तर 

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी यांचेही तिकीट कापण्यात आले. त्यांच्याऐवजी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. उत्तर पश्चिम मुंबईतून लढण्यास गजानन कीर्तिकर यांनी नकार दिला. इथे आता रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

ADVERTISEMENT

2019 लढवलेले कोणते मतदारसंघ गेले मित्रपक्षांकडे?

उस्मानाबाद, अमरावती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, शिरूर, पालघर, रायगड, परभणी, सातारा या लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिले होते. मात्र, यातील उस्मानाबाद, रायगड, शिरूर हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आहेत.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> 'उद्धव ठाकरे, शरद पवारांबद्दल महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट', भुजबळांचे मोठे विधान 

अमरावती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर, सातारा हे मतदारसंघ भाजपकडे गेले असून, परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना देण्यात आली आहे.

2019 मध्ये लढल्या होत्या २३ जागा

शिवसेनेने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत २३ जागा लढवल्या होत्या. त्यावेळी शिवसेना भाजपसोबत युतीमध्ये होती. भाजपने २५ जागा लढवल्या होत्या. मात्र, यावेळी शिवसेनेत फूट पडली असून, ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडीत आहे, तर शिंदेंची शिवसेना ही महायुतीमध्ये आहे. यावेळी जागावाटपात महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला २१ जागा मिळाल्या असून, शिंदेंच्या सेनेला १५ जागा मिळाल्या आहेत. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT