मांसाहार खाण्यावरून मराठी माणसांना अपमानास्पद वागणूक! मनसेनं गुजराती लोकांना दिला दणका, घाटकोपरमध्ये काय घडलं?

मुंबई तक

Marathi vs Gujrati : मागील काही महिन्यांमध्ये मुंबईतील सोसायटींमध्ये मराठी-अमराठी वाद झाल्याचं समोर आलंय. ठाणे, कल्याणमध्येही मराठी माणसांचा अपमान केल्याचा संतापजनक प्रकार घडला होता.

ADVERTISEMENT

Marathi-Gujrati Clash In Ghatkopar Society
Marathi-Gujrati Clash In Ghatkopar Society
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील घाटकोपरच्या सोसायटीत मराठी-गुजराती वाद का पेटला?

point

नॉनव्हेज खाण्यावरून मराठी माणसांना का केलं टार्गेट?

point

मनसे कार्यकर्त्यांनी गुजराती लोकांना दिला दणका

Marathi vs Gujrati : मागील काही महिन्यांमध्ये मुंबईतील सोसायटींमध्ये मराठी-अमराठी वाद झाल्याचं समोर आलंय. ठाणे, कल्याणमध्येही मराठी माणसांचा अपमान केल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी लोकांना चांगलाच दणका दिला होता. दरम्यान, घाटकोपरच्या गृहनिर्माण सोसायटीतही मराठी कुटुंबियांना शुल्लक कारणावरून त्रास दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या सोसायटीत राहणाऱ्या गुजराती समाजातील काही लोकांनी मांसाहार खाणाऱ्या मराठी माणसांना अपमानास्पद वागणूक दिली. 

घाटकोपरच्या त्या सोसायटीत मराठी-गुजराती वाद का झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, गुजराती समाजाच्या काही लोकांनी मराठी कुटुंबियांचा अपमान केला. नॉनव्हेज फूडमुळे दुर्गंधी निर्माण होते. यामुळे सोसायटीचं वातावरण खराब होतं, असं म्हणत गुजराती समाजातील लोकांनी मराठी माणसांना टार्गेट केलं. त्यानंतर दोन्ही ग्रुपमध्ये बाचाबाची सुरु झाली. वाद विवाद वाढल्यानंतर मराठी लोकांनी मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्थे यांना घडलेल्या प्रकाराबाबत सांगितलं. 

हे ही वाचा >> कामाची बातमी: ड्रायव्हिंग लायसन्समध्ये काही मिनिटांतच अपडेट करा फोन नंबर; 'या' स्टेप्स करा फॉलो

त्यानंतर राज पार्थे त्या सोसायटीत पोहोचल्यानंतर गुजराती समाजाच्या लोकांना शांत करण्याचा आणि समजूत देण्याचा प्रयत्न केला. राज पार्थे गुजराती समाजाच्या लोकांना म्हणाले, "प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात काय खायचं आहे आणि काय जेवण बनवायचंय, याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.

हे ही वाचा >> Waqf Act: आताची सगळ्या मोठी बातमी, मोदी सरकारला झटका.. वक्फ कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

मराठी लोक घाणेरडे आहेत, म्हणून महाराष्ट्र घाणेरडं आहे, असं म्हणायचं कोणालाच अधिकार नाही. जर असं असेल तर मग तुम्ही इथे येऊन का राहता?" असा सवालही पार्थे यांनी उपस्थित केला. तसच सोसायटीत शांततेचं वातावरण ठेवण्यासाठीही पार्थे यांनी सर्वांना आग्रह केला. खूप चर्चा झाल्यानंतर दोन्ही समाजाच्या लोकांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. कोणीही त्याच्या घरी काय जेवण बनवतं, याकडे लक्ष दिलं जाणार नाही, असा निर्णय घेतल्यानंतर हे प्रकरण शांत झालं.

हे वाचलं का?

    follow whatsapp