Shiv Sena UBT : ठाकरेंचे लोकसभेचे 17 शिलेदार ठरले? कोणत्या जागेवर कोण उमेदवार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत.
उद्धव ठाकरे कोणत्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार याची संभाव्य यादी.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची तयारी

point

महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित होताच होणार घोषणा

point

कोणत्या मतदारसंघात कुणाला मिळणार संधी?

Shiv Sena UBT Candidates : महाविकास आघाडीच्या जागावाटपाची घोषणा अजूनही झालेली नाही. असे असले तरी तिन्ही पक्षानी आपापल्या वाट्याला येणाऱ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये तयारी जोरात सुरू केली आहे. उमेदवारांची नावे जवळ ठरली असून, जागावाटपाच्या घोषणेनंतर कोणत्याही क्षणी नावे जाहीर होतील. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून 17 लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावे समोर आली आहेत. (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party candidates)

ADVERTISEMENT

मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि इतर विभागातील काही जागांवरून काँग्रेस शिवसेनेमध्ये (यूबीटी) पेच निर्माण झाला होता. मात्र, हा पेच सुटला असल्याचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सांगितले जात आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाला सुटणाऱ्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीय केले आहे.

हेही वाचा >> 'हा नालायक, उर्मट... त्यांचा भाऊही म्हणाला..' अजित पवारांवर शिवतारेंची जहरी टीका 

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 17 उमेदवार जवळपास निश्चित झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

हे वाचलं का?

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संभाव्य लोकसभा उमेदवार

उत्तर मुंबई -विनोद घोसाळकर
ईशान्य मुंबई - संजय दिना पाटील
दक्षिण मुंबई - अरविंद सावंत
दक्षिण मध्य मुंबई - अनिल देसाई
औरंगाबाद - चंद्रकांत खैरे
बुलढाणा - नरेंद्र खेडकर
यवतमाळ वाशिम - संजय देशमुख
उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर 
परभणी - बंडू जाधव
शिर्डी - रावसाहेब वाघचौरे
नाशिक - विजय करंजकर
ठाणे - राजन विचारे
रायगड - अनंत गिते
हिंगोली - नागेश आष्टीकर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत
सांगली - चंद्रहार पाटील
मावळ - संजय वाघेरे

यातील मावळमधून संजय वाघेरे यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अनंत गीते यांनी केली होती. त्याचबरोबर विनायक राऊत आणि अनंत गीते यांची उमेदवारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगडमधून निश्चित झालेली आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> बारामतीत जाऊन अजित पवारांना नालायक म्हणणारे 'श्रीनिवास पवार' आहेत तरी कोण? 

परभणी येथून पुन्हा संजय जाधव, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, ठाण्यातून राजन विचारे, उस्मानाबादमधून ओम राजे निंबाळकर, औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांच्या नावांची घोषणा होण्याचीच फक्त औपचारिकता राहिली आहे.

ADVERTISEMENT

कल्याण-डोंबिवली, पालघर, जालना या मतदारसंघातील उमेदवारीबद्दल काही नावांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अंतिम निर्णयानंतरच लोकसभेच्या रिंगणात ठाकरेंचे कोणते शिलेदार असणार हे दिसेल. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT