Satara: उदयनराजेंनी मारली शिवेंद्रराजेंना मिठी, अन्... पाहा सॉलिड Video
Udayanraje and Shivendraraje: साताऱ्यातील दोन राजे जे एकमेकांचे राजकीय वैरी समजले जातात.. पण त्याच दोन राजांमधील म्हणजे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वैर मिटल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
Udayanraje and Shivendraraje: साताऱ्यातील दोन राजे जे एकमेकांचे राजकीय वैरी समजले जातात.. पण त्याच दोन राजांमधील म्हणजे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वैर मिटल्याचं पाहायला मिळत आहे.
Udayanraj and Shivendraraje Video: सातारा: कट्टर राजकीय विरोधी उदयनराजे भोसले आणि त्यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले यांची आज (30 मार्च) साताऱ्यात भेट झाली आहे. शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळीच उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. यावेळी उदयनराजे यांची गळाभेट घेत त्यांना गालावर प्रेमाने मुका देखील घेतला. जी दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंची घेतलेली ही भेट आता बरीच चर्चेत आहेत. (lok sabha election 2024 satara lok sabha udayanraje bhosale hugged shivendra raje bhosale and settled the dispute watch solid video)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
...अन् उदयनराजे झाले भावनिक!
'कुठेतरी राजकारणामध्ये थांबायचं असतं..' असं भावनिक होत उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंची गळाभेट घेतली. ते म्हणाले, आता जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं राजकारण शिवेंद्रराजे तुम्ही बघा.. सातारचा राजकारण तुम्ही बघा, राजकारणात ज्या काही घटना होऊन गेल्या त्याची दिलगिरी व्यक्त करतो. माफी मागणार नाही.' असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी अनेक दिवसाचा राजकीय वाद वाढदिवसाच्या निमित्ताने एका झटक्यात मिटवला.
हे ही वाचा>> पवारांच्या NCP उमेदवारांची घोषणा, पाहा संपूर्ण यादी
'उदयनराजेंची भेट ही दहा हत्तीचे बळ देणारी आहे. उदयनराजेंना लवकरात लवकर तिकीट जाहीर व्हावं. म्हणजे जास्तीत जास्त ताकदीने काम करता येईल. वरिष्ठ पातळीवर होणारे निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावेत.' अशा प्रतिक्रिया देखील शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT