रोहित पवारांकडून खेकड्याचा छळ, PETA ने केली कारवाईची मागणी! नेमकं प्रकरण काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

PETA action on Rohit Pawar :  प्राणी हक्क संघटना पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स (PETA) ने आमदार रोहित पवार यांच्या विरोधात निवडणूक आयोग अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. एका पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी खेकड्याला बांधून छळ केल्याबद्दल PETA ने ही कारवाईची मागणी केली आहे. (Torture of crab by Rohit Pawar in press conference PETA demanded action Write letter to sharad pawar)

ADVERTISEMENT

या प्रकरणी पेटा म्हणते की, 'आमदाराचे हे पाऊल प्राणी प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करते. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 24 मार्च 2014 रोजी दिलेल्या सूचनांमध्ये निवडणुकीत प्राण्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.'

'खेकडे वापरणे ही एक विचारपूर्वक केलेली रणनीती'

PETA इंडिया ॲडव्होकसी असोसिएट शौर्य अग्रवाल यांनी शरद पवार आणि जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल काळसकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'रोहित पवार यांनी खेकड्याचा वापर करणे ही विचारपूर्वक केलेली रणनीती होती हे व्हिडीओवरून स्पष्ट होते. मीडिया स्टंटसाठी त्यांनी प्राण्याला त्रास दिला आहे.'

हे वाचलं का?

निवडणुकीत प्राण्यांच्या वापरावर बंदी घालावी- PETA

PETA च्या निवेदनात म्हटले आहे की, 'PETA India ने निवडणूक आयोगाला कळवले होते की निवडणूक प्रचार आणि रॅलीसाठी प्राण्यांचा विनाकारण छळ केला जात आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुकीत प्राण्यांच्या वापरावर बंदी घातली होती.'

निवेदनात म्हटले आहे की 2013 च्या अधिसूचनेत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचारादरम्यान गाढव, बैल, हत्ती आणि गायींच्या वापरावर बंदी घातली होती आणि अधिकाऱ्यांना उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्याचवेळी PETA इंडियानेही रोहित पवार यांना पत्र लिहून खेकडा सांभाळण्यासाठी सोपवण्याची विनंती केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT