वाढदिवसाच्याच दिवशी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिली ‘ही’ गोड बातमी

मुंबई तक

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आज विवाहबंधनात अडकली आहे. सोनालीचा आज 33वा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्याच दिवशी तिने कुणाल बेनोदकर याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये सोनालीचा साखरपुडा झाला होता. तर आज दुबईमध्येच कुणाल आणि सोनालीचं लग्न झालं आहे. सोनालीने स्वतः सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. सोनाली तिच्या पोस्टमध्ये म्हणते, “आम्ही जूनमध्ये युकेला लग्न करणार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आज विवाहबंधनात अडकली आहे. सोनालीचा आज 33वा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्याच दिवशी तिने कुणाल बेनोदकर याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये सोनालीचा साखरपुडा झाला होता. तर आज दुबईमध्येच कुणाल आणि सोनालीचं लग्न झालं आहे.

सोनालीने स्वतः सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. सोनाली तिच्या पोस्टमध्ये म्हणते, “आम्ही जूनमध्ये युकेला लग्न करणार होतो. युकेमध्ये आलेल्या सेकंड वेवमुळे तारीख पुढे करावी लागली. मग जुलैमधील तारीख ठरली. लग्नाच्या तयारीसाठी मी मार्चमध्ये शूटींग संपवून दुबईला आले आणि भारतात दुसरी लाट आली. मी पुन्हा एकदा दुबईत अडकले पण लग्न बंधनात ही!”

सोनाली तिच्या पोस्टमध्ये पुढे म्हणते, “जुलैपर्यंत परिस्थिती बदलणार नाही म्हणून एप्रिलमध्ये युकेने भारतीयांसाठी प्रवासाला बंदी केली. क्वारंटाईन, प्रवासाचे निर्बंध तसंच कुटुंबासाठी असणारा धोका, एकंदरीत होणारा अनावश्यक खर्च, सरकारचे नियम या सगळ्यांचा विचार करून आम्ही आमचा भला मोठा लग्न समारंभ रद्द करायचा निर्णय घेतला. जुनचं जुलै होतंय, म्हणलं पुढे ढकलण्याच्या ऐवजी जुलैचं मेमध्ये प्रिपॉन करून सगळ्यांनाच सुखद धक्का देऊ.”

“आम्ही आता एकत्र एका देशात आहोत. पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातील परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ. आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलंही सेलिब्रेशन करूच शकत नाही. तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही.”, असंही सोनालीने म्हटलंय.

लग्न किती लवकर आटपलं याबाबत सोनाली लिहीते, “आई-बाबांचा होकार घेऊन लगेच तयारीला लागलो. माझे आई-बाबा भारतात, कुणालचे लंडनला. कधी पुन्हा सगळे एकत्र येतील माहीत नाही. आताच शिक्का मोर्तब करून टाकू. त्यानुसार २ दिवसात सगळं ठरवलं. एका तासात खरेदी आणि १५ मिनिटांमध्ये ४ लोकांच्या साक्षीने मंदिरात, वरमाळ, मंगळसूत्र, कुंकू केवळ या ३ गोष्टी करून मॅरेज सर्टिफिकेटवर सही केली.”

हे वाचलं का?

    follow whatsapp