Khalilur Rehman Qamar: महिलेने दिग्दर्शकाला रुममध्ये बोलावलं अन्... 'तो' अश्लील Video लीक
Khalilur Rehman Qamar Leak Video : पाकिस्तानी दिग्दर्शक आणि प्लेराइटर खलील उर रहमान कमर याच्या एका अश्लील व्हिडीओने इंटरनेटवर खलबळ उडाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पाकिस्तानी दिग्दर्शकाचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल
Khalilur Rehman Qamar Leak Video : पाकिस्तानी दिग्दर्शक आणि प्लेराइटर खलील उर रहमान कमर याच्या एका अश्लील व्हिडीओने इंटरनेटवर खलबळ उडाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये खलील एका महिलेसोबत दिसत आहे. दोन पार्टमध्ये असलेल्या या व्हिडिओच्या पहिल्या पार्टमध्ये खलील एका महिलेसोबत बंद खोलीत धूम्रपान करताना दिसत आहे. यानंतर व्हिडीओच्या दुसऱ्या पार्टमध्ये खलील महिलेसोबत पूर्णपणे नग्न अवस्थेत आहे. आता व्हिडीओंमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (khalilur rehman qamar caught in honey trap obscene leak video on social media)
ADVERTISEMENT
दिग्दर्शकाचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल
काही दिवसांपूर्वीच खलील उर रहमान कमर हा महिला आणि तिच्या साथीदारांच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. अलीकडेच पोलिसांनी या प्रकरणात हसन शाह नावाच्या व्यक्तीला अटक केली होती, जो हनी ट्रॅप प्रकरणाचा कथित सूत्रधार आहे. शाहा 12 जणांची टोळी चालवतो, त्यात महिलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. हसनशिवाय पोलिसांनी पेशावरमधून रफिक नावाच्या व्यक्तीलाही अटक केली आहे.
हेही वाचा : Puja Khedkar : पूजा खेडकरची IAS नोकरी गेली! यूपीएससीचा सर्वात मोठा दणका
माहितीनुसार, या टोळीने खलील उर रहमान कमरचे अपहरण केले होते. यानंतर त्याची सुटका करण्यासाठी खंडणी घेतली होती. त्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकी या टोळीने दिग्दर्शक खलील उरला दिली होती. नुकत्याच दिलेल्या निवेदनात या प्रकरणातील मुख्य आरोपीने दावा केला होता की त्याच्याकडे खलीलचे दोन व्हिडीओ आहेत. दोन्ही व्हिडीओ सुमारे दीड तासाचे आहेत, ज्यामध्ये खलील एका महिलेसोबत जवळीक साधताना दिसत आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा : Uddhav Thackeray: 'एक तर तू राहशील नाहीतर मी तरी...', ठाकरेंचं फडणवीसांना खुलं आव्हान
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खलील हा वाईट हेतूने महिलेला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. त्याचे उद्दिष्ट स्क्रिप्टराइटिंग नव्हते तर दुसरेच काहीतरी होते. मात्र, याच्या प्रत्युत्तरात खलील उर रहमान कमरने दावा केला आहे की, त्याचे कॉम्प्रोमाइजसाठीच्या व्हिडिओसाठी अपहरण केले होते. पोलीस अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत. टोळीतील 12 जणांसह खलीलला भेटलेल्या महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT