Panchayat 4 : फुलेरा ग्रामपंचायतीत पुन्हा होणार मनोरंजनाचा वर्षाव! 'या' दिवशी प्रदर्शित होणार पंचायतचा सीजन 4
Panchayat Season 4 Release Date : लहान मुलांपासून अगदी मोठ्या मंडळींना आवडणारी वेबसीरिज म्हणजे पंचायत. लोकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या ही पंचायत वेबसीरिज पुन्हा एकदा ओटीटीवर झळकणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पंचायत सीजन 4 कोणत्या तारखेला रिलीज होणार?

फुलेरा ग्रामपंचायत मनोरंजनासाठी पुन्हा उघडणार

फुलेरा गाव पुन्हा जिंकणार लोकांची मनं
Panchayat Season 4 Release Date : लहान मुलांपासून अगदी मोठ्या मंडळींना आवडणारी वेबसीरिज म्हणजे पंचायत. लोकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या ही पंचायत वेबसीरिज पुन्हा एकदा ओटीटीवर झळकणार आहे. म्हणजेच 'पंचायत सीजन 4' लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. पंचायतच्या नव्या सीजनची घोषणा झाल्यानंतर प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित झाला आहे. प्राईम व्हिडीओने पंचायत 4 ची घोषणा करत इन्स्टाग्राम पेजवर मजेशीर मिम्स पोस्ट केले आहेत. कारण सीजन 4 सोबतच सीरिजला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे या वेबसीरिजची रिलीज डेटही त्यानुसारच ठेवण्यात आलीय. दरम्यान, चाहत्यांची पंचायत सीजन 4 पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
फुलेरा गाव पुन्हा जिंकणार लोकांची मनं
प्रधान नीना गुप्तांच्या फोटोला कॅप्शन देत म्हटलंय की, पंचायतच्या पाच वर्षांची पार्टी मिळेल ना..सचिव जी? दुसऱ्या फोटोत जितेंद्र यांच्या फोटोत लिहिलंय की, MBA आधी पंचायतचे 5 वर्ष पूर्ण झाले. रघुवीर यादव आणि फैजल मलिक यांच्या एका फोटोत लिहिलं गेलं की, पंचायतीच्या 5 वर्षांच्या पार्टीसाठी फंड पाहिजे. तर अशोक आणि दुर्गेशच्या फोटोसोबत लिहिलं की, विनोद पाहतोय ना.. माझ्या आवाजात ही पोस्ट वाचली जात आहे..यावर चंदन रॉय म्हणतात, कुंडली मिळो ना मिळो..पंचायतीच्या 5 वर्षांची पार्टी मिळणं गरजेचं आहे. सुनीता आणि दुर्गेश म्हणतात, करत राहा कमेंट कमेंट, अल्हुआ कमेंट..त्यानंतर शेवटच्या फोटोत म्हटलंय की, 5 वर्षांची पंचायत पुन्हा एकदा 2 जुलैला प्रेक्षकांच्या भेटिला येत आहे. या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करत लोकांनी वेबसीरिज पाहण्याच्या उत्सुकतेचं दर्शन घडवलंय.
हे ही वाचा >> जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा? भाजप आमदाराच्या PA च्या पत्नीचा मृत्यू, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर गंभीर आरोप
पाच वर्ष पंचायतने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं
पंचायतच्या तिसऱ्या सीजनही प्रचंड गाजला होता. हा सीजन पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. सचिव जी चं ट्रान्सफर, फुलोरा ग्रामपंचायतची जॉइनिंग आणि प्रधानजीला कोणी गोळी मारली? असे मोठे सवाल आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. इचकच नव्हे तर सचिव जींच्या लव्ह ट्रायएंगलची हिंटही देण्यात आलीय. आता चौथ्या सीजनमध्ये प्रेक्षकांना पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हे ही वाचा >> 4th April 2025 Gold Rate : ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री! एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीचे दर कडाडले
पंचायत वेबसीरिजची सुरुवात वर्ष 2020 मध्ये झाली होती. गावातील कल्चरवर बनलेली ही वेबसीरिज तेव्हापासून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या वेबसीरिजने तीन पुरस्कारही जिंकले असून पंचायत चाहत्यांच्या गळ्यातील ताईतच बनली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच तमाम पंचायत सीजन 4 ची आतुरतेने वाट पाहत आहेत.