'जावेद जाफरीच्या लेकाला अंबानींकडून 30 कोटींचे अपार्टमेंट भेट'; KRK चा दावा, फेक की फॅक्ट?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

KRK ने केलेल्या दाव्यात नेमकं काय?  

point

KRK च्या दाव्यावर जावेद जाफरीची प्रतिक्रिया

point

मीझान जाफरीने कोणत्या चित्रपटात केलंय काम?

KRK on Meezan Jaaferi : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता जावेद जाफरीचा (Javed Jaaferi) मुलगा अभिनेता मीझान जाफरी (Meezan Jaaferi) अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात आपल्या डान्स मूव्ह्जने सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसला. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यासर्वात त्याच्याबद्दलची एक बातमी चांगलीच चर्चेत आहे. अभिनेता कमाल राशिद खानने दावा केला आहे की, मीझानला मुकेश अंबानींकडून एक आलिशान अपार्टमेंट भेट म्हणून मिळाले आहे. यावर आता मीझानचे वडील म्हणजेच अभिनेता जावेद जाफरीने प्रतिक्रिया दिली आहे. (KRK on Meezan Jaaferi he claimed that mukesh ambani gifted meezan an apartment in bandra worth rupees 30 crore)

ADVERTISEMENT

KRK ने केलेल्या दाव्यात नेमकं काय?  

कमाल राशिद खानने (KRK) त्याच्या ट्वीटर (X) हँडलवर दावा केला की, "अभिनेता जावेद जाफरी यांचा मुलगा मीझान जावेद जाफरी मुंबईतील वांद्रे येथील संधू पॅलेसमध्ये राहतो. कारण मुकेश अंबानींनी त्याला हे 30 कोटी रुपयांचे अपार्टमेंट गिफ्ट केले होते. कारण मीझाननेच राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांची भेट घडवून आणली होती. त्याच्यामुळेच त्या दोघांची ओळख झाली होती. काहीही होऊ शकते."

हेही वाचा : Vishalgad : "...ही घटना टळली असती"; शाहू महाराज संतापले, सरकारला सुनावले

KRK च्या दाव्यावर जावेद जाफरीची प्रतिक्रिया

मात्र, केआरकेचे हे ट्विट व्हायरल होताच जावेद जाफरीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. जावेद जाफरीने केआरकेच्या ट्विटला हसणाऱ्या इमोजीसह "काहीही!!!" असे म्हणत उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी जाफरी कुटुंब प्रसिद्धीच्या झोतात आले होते, जेव्हा त्यांच्या मुंबईतील 7000 चौरस फुटांच्या आलिशान घराचे फोटो व्हायरल झाले होते. जावेद जाफरीचे घर वांद्रे येथे आहे, जिथे तो त्याची पत्नी आणि मुलं मीझान आणि अलविया जाफरी राहतात.

हे वाचलं का?

हेही वाचा : Anant Ambani Wedding : अनंत अंबानीच्या लग्नात घुसखोरी, आंध्रप्रदेश कनेक्शन...; ते दोन आरोपी कोण?

मीझान जाफरीने कोणत्या चित्रपटात केलंय काम?

मीझानबद्दल बोलायचे तर, अभिनेत्याने 'मलाल' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्यातील त्याच्या अभिनयाची चाहत्यांकडून खूप प्रशंसाही झाली. त्याने 2021 मध्ये हंगामा 2 सारख्या चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. मीझान शेवटचा दिव्या खोसलासोबत 'पर्ल व्ही पुरी' आणि 'यारियां 2' मध्येही दिसला होता. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT