Rajinikanth Admitted to Hospital: सुपरस्टार रजनीकांत रूग्णालयात दाखल, एका रात्रीत असं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती बिघडली

point

डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट

point

रजनीकांत यांच्यासोबत एका रात्रीत काय घडलं?

Rajinikanth Health Update : सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती सोमवारी (30 सप्टेंबर) रात्री अचानक बिघडली. त्यांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटदुखीच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण नुकत्याच आलेल्या त्यांच्या हेल्थ अपडेटनुसार, 73 वर्षीय अभिनेते रजनीकांत यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. रूग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. साई सतीश यांच्या टीमकडून रजनीकांत यांची तपासणी केली जात आहे.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांना आज काही टेस्ट कराव्या लागू शकतात. त्याचबरोबर दक्षिणात्य लोक रजनीकांतची देवाप्रमाणे पूजा करतात. रजनीकांत यांना चाहते 'थलैवा' असं म्हणतात. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी लोक आता प्रार्थना करत आहेत.

हेही वाचा : Gold Rate: 'वाढीव तुमचा ह्यो कारभार...'; सोन्याने तर केलंय मार्केट जाम! पाहिलेत का आजचे 1 तोळ्याचे भाव?

रूग्णालयात दाखल होण्यापूर्वी, रजनीकांत अलीकडेच त्यांच्या आगामी चित्रपट वेट्टय्यानच्या ऑडिओ लॉन्चमध्ये दिसले. ऑडिओ लॉन्च इव्हेंटमध्ये रजनीकांत यांनी काही डान्स मूव्ह्स देखील केल्या होत्या. हा चित्रपट आता 10 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. Vettaiyaan हा रजनीकांत यांचा 170 वा चित्रपट आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यानंतर 2025 मध्ये दोन मोठ्या चित्रपटांमध्ये रजनीकांत दिसणार आहेत. हुकुम आणि कुली असे त्यांचे दोन चित्रपट आहेत. जे 2025 मध्ये प्रदर्शित होतील. या आधीच्या 'जेलर' चित्रपटाप्रमाणेच हे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर कमाल करतील.

हेही वाचा : Maharashtra weather: कुठे मुसळधार तर, कुठे दिलासा... राज्यात आज पावसाचा अंदाज काय? 

जेलरने बॉक्स ऑफिसवर 600 कोटींचा व्यवसाय केला होता. माहितीनुसार, रजनीकांत यांनी या चित्रपटासाठी 210 कोटी रुपये फी घेतली होती. थलायवाची गणना दक्षिणेतील सर्वात महागड्या आणि श्रीमंत कलाकारांमध्ये केली जाते. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे आणि लक्झरी कारचे कलेक्शनही आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT