Malaika Arora: मलायका आणि मैत्रिणींचा विषयच हार्ड ना भाऊ, फोटो पाहून तुम्हीही...
Malaika Arora Hot Pics: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने तिचे आणि तिच्या मैत्रिणींचे काही ग्लॅमरस आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या सगळ्या जणी सध्या गोव्यात सुट्टी एन्जॉय करत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बॉडीकॉन ड्रेसमध्ये मलायका अरोराच्या हॉट अदा

समुद्रकिनाऱ्यावर मलायकाच बोल्ड लूक

मलायकाच्या लूकने चाहते झाले घायाळ
Malaika Arora Photos: पणजी: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा स्टाईल स्टेटमेंट आणि सौंदर्याच्या बाबतीत आजही अनेक तरुणींना टक्कर देते. वयाच्या 51 व्या वर्षीही मलायका तिच्या सौंदर्याने आणि स्टाईलने चाहत्यांना वेड लावत आहे. (bollywood hot actress malaika arora shines in a bodycon dress spreads her charm on the beach her friends also give hot poses fans are impressed)

मलायकाने नुकतेच तिचे जे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत त्यामध्ये तिचा हॉट लूक पाहायला मिळत आहे. मलायकाने तिच्या ग्लॅमरस स्टाईलने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना अक्षरश: घायाळ केलं आहे. मलायका गोव्यात तिच्या मैत्रिणींसोबत खूप एन्जॉय करताना दिसली.

नवीन फोटोमध्ये, मलायका पांढऱ्या ऑफ-शोल्डर बॉडी-हगिंग गाऊनमध्ये तिच्या टोन्ड फिगरला फ्लॉन्ट करताना दिसत आहे. मलायकाने तिच्या केसांमध्ये बन बनवला आहे. तसंत तिचे हलका चमकदार मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे.

मलायका समुद्रकिनाऱ्यावरील क्रूझवर सूर्यास्ताचा आनंद घेताना दिसली. ती गोव्यात प्रत्येक क्षण संस्मरणीय बनवत आहे. तिची स्टाईल, तिचा लूक आणि गोव्याचे सुंदर दृश्य पाहण्यासारखे आहे.

मलायकासोबत तिच्या गर्ल गँगमध्ये तिची बहीण अमृता अरोरा, किम शर्मा, गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांचाही समावेश आहे. फोटोमध्ये सगळे एकमेकांसोबत मजा करताना दिसत आहेत.

मलायकाचे ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तिच्या सौंदर्यासोबतच चाहते तिच्या फिटनेसचेही वेडे आहेत.

एका युजरने मलायकाचे कौतुक करताना लिहिले - खूपच सुंदर. दुसऱ्याने लिहिले- मल्ला माझी आवडती आहे. काही जण मलायकाला स्टनिंग म्हणत आहेत तर काही जण तिला आगळीवेगळी म्हणत तिचे कौतुक करत आहेत. मलायकाची स्टाईल तुम्हाला कशी वाटली?
(Photo Credit: Malaika Arora Instagram)